Dhule: धुळ्यातील जैताणे ग्रामपंचायतमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी आपला मनमानी कारभार चालला आहे. दलित वस्ती मध्ये येणारा निधी हा आपल्या वार्डांमध्ये वळवून सरपंच मनमानी करत असल्याचं सांगत आज प्रजासत्ताक दिनादिवशी जिल्हा परिषदेच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला. जैताणे ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करा अशी मागणी या समाधान महाले यांनी केल्याने प्रजासत्ताक दिनादिवशी (Republic Day 2025) मोठा अनर्थ होणार होता. मात्र, वेळीच जिल्हा परिषद सिओ यांचे अंगरक्षक यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी समाधान महाले यांना ताब्यात घेऊन संबंधित पोलीस ठाण्यात या पोलीस अधिकाऱ्यांना बोलून त्यांच्या ताब्यात देण्यात आल्याने मोठा अनर्थ यावेळी टाळला आहे. (Dhule News)
नक्की काय झाले?
गेल्या अनेक वर्षापासून दलित वस्तीकरिता निधी मिळवा यासाठी मी प्रयत्न करीत आहे. मात्र सरपंच व ग्रामसेवक संगणमत करून मला तो निधी मिळू देत नाही. 2022 व 23 या साली 5 लाख रुपये खर्च करून दलित वस्तीमध्ये हायमास (लाईट) लावण्याच्या कामाकरिता 5 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला व त्याचे बिल देखील काढण्यात आले, मात्र अद्याप पर्यंत दलित वस्तीमध्ये हायमास (लाईट) कुठे आहे? हे समजू शकले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जैताणे ग्रामपंचायत मध्ये सरपंच व ग्रामसेवक भ्रष्टाचार करीत आहे त्यांच्यावर कारवाई करावी या मागणी करिता जैताणे ग्रामपंचायतीचे सदस्य समाधान महाले यांनी आज प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषदेच्या (Jaitane Grampanchayat) आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र वेळीच जिल्हा परिषद सिओ यांचे अंगरक्षक यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी लागलीच समाधान महाले यांना ताब्यात घेऊन संबंधित पोलीस ठाण्यात या पोलीस अधिकाऱ्यांना बोलून त्यांच्या ताब्यात यावेळी देण्यात आले त्यामुळे मोठा अनर्थ यावेळी टाळला आहे. (Dhule News) प्रजासत्ताक दिनाला सुरुवात होताच आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. ग्रामपंचायत सदस्य समाधान महाले यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले. सरपंचाचा निषेध करत आपल्या मागण्या समाधान महालेंनी ओरडून सांगितल्या. पण वेळीच पोलिसांनी त्याला बाजूला नेल्याने प्रजासत्ताक दिनादिवशी होणारा अनर्थ टळला आहे.
हेही वाचा: