Dhule Local News Updates : राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालानुसार राज्यातील धुळे जिल्ह्यातील महिला सर्वाधिक मद्यापी महिला म्हणून अव्वलस्थानी असल्याचा धक्कादायक अहवाल नुकताच समोर आला. मात्र हा अहवाल चुकीचा असून राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालात ही प्रिंटिंग चूक झाल्याचं समोर आलं आहे. या अहवालाविरोधात आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिरराव यांनी सांगितलं आहे.
तरुणी व महिलांच्या मद्यव्यसनामध्ये राज्यात धुळे जिल्हा (38.2 टक्के) तर पुरुषांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा (34.7 टक्के) प्रथम क्रमांक लागतो. अशी धक्कादायक माहिती राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालात समोर आल्याचा प्रकार गेल्या दोन दिवसांपूर्वी घडला. या अहवालाच्या माहितीमुळे जिल्ह्यातील महिलांची बदनामी झाली असून हा अहवाल अत्यंत चुकीचा असून ती अहवालातील प्रिंटिंग मिस्टेक असल्याच समोर आलं आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालाच्या माहितीनंतर एकच खळबळ उडाली मात्र त्यानंतर हा अहवाल अत्यंत चुकीचा असल्याचे समोर आल्यानंतर याबाबत आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कडे तक्रार दाखल करणार असून संबंधित विभागाविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिरराव यांनी दिली आहे....
शिंदे-फडणवीस सरकारवर केले आरोप
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य अहवालात चुकीची माहिती देण्यात आल्याने जिल्ह्यातील महिलांचा अपमान झाला आहे. महिलांचा अपमान करण्याऱ्या या विभागावर शिंदे-फडणवीस सरकारने तात्काळ कारवाई करावी, तसेच हा अहवाल त्वरित मागे घ्यावा. अन्यथा अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. तसेच या अहवालाला शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा देखील आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
जिल्ह्यात दारूबंदी करण्याची मागणी
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य विभागाच्या अहवाल नुसार राज्यात धुळे जिल्ह्यातील महिला मद्यपान करण्यात प्रथम क्रमांकावर असल्याचा अहवाल समोर आला. त्यानंतर हा अहवाल धक्कादायक असून शहरातील विविध ठिकाणी पोलिसांनी छापे टाकावे, तसेच शासनाने व्यसनमुक्ती सारख्या चळवळीला प्रोत्साहन द्यावे धुळे जिल्हा 100% दारूबंदी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी महाराष्ट्र दारूबंदी महिला मोर्चाच्या अध्यक्ष गीतांजली कोळी यांनी केली आहे...
उत्पादन शुल्क विभागाला धडा शिकवणार
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाल्यानंतर शिवसेनेने देखील याचा निषेध केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने योग्य ती आकडेवारी जाहीर करावी. अन्यथा महिलांची बदनामी केल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने माफी मागावी, अशी मागणी करत चुकीची माहिती दिल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाला धडा शिकवू असा इशारा शिवसेनेने दिला आहे.