धुळे : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Agra Highway) 70 पेक्षा जास्त प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स (Trvales Bus) तोल गेल्याने उलटल्याची घटना घडली. सुदैवाने यात जिवीतहानी टळली असून एका चार वर्षीय मुलीच्या हाताला जबर दुखापत झाल्याची घटना घडल्याची देखील माहिती आहे. तर तब्बल वीसहून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. नाशिकसह (Nashik) विभागात अपघाताचे सत्र सुरूच असून सातत्याने होणाऱ्या अपघातामुळे (accident) अनेकांना प्राणाला मुकावे लागत असल्याचे चित्र आहे. मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार पुण्याहून (Pune) उत्तरप्रदेशकडे (UP) जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील नरडाणा गावापासून काही अंतरावर तोल गेल्याने अपघात झाल्याची घटना आज घडली. या ट्रॅव्हल्समध्ये 70 पेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती मिळाली असुन या घटनेत वीज प्रवासी जखमी झाले असून दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी नरडाणा पोलीसांसह स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले असून जखमी झालेल्या प्रवासांना धुळे जिल्हा रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.


मुंबई आग्रा महामार्गावर अपघात (Mumbai Agra Highway Accident)  झालेल्या ट्रॅव्हल्समधील प्रवासींना तात्काळ बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या अपघातात जिवीत हानी टळली असून एका मुलीच्या हाताला गंभीर दुखापत झाली तर 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले घटनास्थळी महामार्ग पोलीसांकडून देखील मदतकार्य सुरु आहे. ट्रॅव्हल्समधून प्रवास करत असलेल्या प्रवाशांचे सामान मोठ्या प्रमाणावर ट्रॅव्हल्सवर असल्याने एका वळणावर तोल गेल्याचे प्राथमिक माहिती आहे. जेव्हा ट्रॅव्हल्स उलटली तेव्हा मार्गावर वर्दळ नसल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र ट्रॅव्हल्स उलटल्याने ट्रॅव्हल्समधील प्रवाशांची मोठी आरडाओरड झाली. तसेच रस्त्यावर ट्रॅव्हल्स उलटल्याने मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. 


खासगी ट्रॅव्हल्समधील सुरक्षा पुन्हा वाऱ्यावर  


गेल्या अनेक दिवसांपासुन समृद्धी महामार्गासह नाशिक विभागातील इतर महामार्गवर सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. अनेकदा स्पीड आणि रस्ते खराब असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. तर यापूर्वीही बसमध्ये ओव्हरलोडिंग असल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. महामार्ग पोलिसांनी सूचना करूनही खासजि वाहनचालक अव्वाच्या सव्वा प्रवाशी वाहनात भरून वाहतूक करत असतात. अशावेळी एखादा अनुचित प्रकार झाल्यास मोठ्या जीवितहानीला सामोरे जावे लागते. यापूर्वी नाशिक आणि बुलढाणा जिल्हा परिसरात दोन मोठ्या घटना घडल्या आहेत. यामुळे खासगी ट्रॅव्हल्स अजूनही प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत सजग नसल्याचे समोर येत आहे. 



इतर महत्वाची बातमी : 


Dhule News : चार वर्षांपासून शिक्षिका शाळेत आलीच नाही, मात्र पगारासाठी दरमहा हजर, धुळे तालुक्यातील शाळेतील प्रकार