धुळे : धुळ्यातील बहुचर्चित जिल्हा परिषद (Dhule ZP Case) अपहार कांडातील आरोपी भास्कर वाघ यांच्या घरातून एकवीरा देवीचे (Ekvira Devi) दागिने जप्त करण्यात आले होते. धुळे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाने 33 वर्षानंतर या दागिन्यांचा लिलाव (Jewelery auction) होऊन श्री एकवीरा देवीच्या दागिन्यांवर रेणुका माता ट्रस्टने सर्वाधिक 16 लाख 51 हजारची बोली लावली. त्यानंतर हे दागिने देवीच्या चरणी अर्पण करत आज तिसऱ्या माळेला हे दागिने श्री एकवीरा देवीला अर्पण करण्यात आले. 


1990 मध्ये बहुचर्चित धुळे जिल्हा परिषद अपहार कांड झाले होते. या प्रकरणातील मुख्य संशयित भास्कर वाघ याच्याविरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात (Deopur Police) दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघ याच्या घरातून देवीचे सोने, चांदीचे दागिने जप्त केले होते. गेली अनेक वर्ष हे दागिने न्यायालयाच्या ताब्यात होते. अखेर न्यायालयाने दागिन्यांचा लिलाव आयोजित करत या लिलावादरम्यान एकविरा देवी ट्रस्टच्या माध्यमातून देवीच्या दागिन्यांवर बोली लावत अखेर दागिने मिळवले आहेत. त्यामुळे देवी भक्तांमध्ये नवचैतन्य पसरले असून नवरात्रीच्या दिवसांत देवीचे दागिने मिळाल्याने मंदिर ट्रस्टने देखील समाधान व्यक्त केले आहे. 


धुळे जिल्हा परिषदेतील संपूर्ण राज्यात गाजलेल्या अपहार कांडातील आरोपी भास्कर वाघ यांच्या घरातून श्री एकवीरा देवीचे दागिने 33 वर्षांपूर्वी जप्त करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून हे दागिने न्यायालयाच्या ताब्यात होते, अखेर या दागिन्यांचा लिलाव करून ते देवीला अर्पण करण्याचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर, श्री एकवीरा देवीवर रेणुका माता ट्रस्टने तब्बल 16 लाख 51 हजारची बोली लावत हे दागिने मिळविले, आज देवीच्या या दागिन्यांची विधिवत पूजा करून तसेच मंत्र उपचाराने पूजा करून दुपारी बारा वाजेच्या महा आरतीनंतर हे दागिने देवीला अर्पण करण्यात आले. यावेळी 5 जोडप्यांच्या हस्ते या दागिन्यांची पूजा करण्यात आली. यावेळी या दागिन्यांची मंदिराच्या परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. यानंतर आई एकवीरा देवीचे हे दागिने देवीच्या गाभाऱ्यात नेल्यानंतर देवीच्या मूर्तीवरील लावण्यात आलेला गजरा आणि काही फुले खाली पडून येताच उपस्थितांनी दैवी अनुभव घेतला.


33 वर्षांनंतर दागिन्यांचा लिलाव 


धुळे शहरातील पांझरा नदीच्या काठावर खान्देश कुलस्वामीनी आदिशक्ती एकविरा मातेचे मंदीर आहे. या मंदिराला सुमारे 400 वर्षाचा इतिहास असून श्री एकवीरा देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सतत भक्तांची मांदियाळी असते. देवीचे भक्तगण खान्देश, संपूर्ण महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजराथ, छत्तीसगड, कर्नाटक तसेच संपूर्ण भारतात पसरलेले आहेत. आदिशक्ती एकवीरादेवीची मुर्ती स्वयंभू, अष्टभुजा, शेंदूरलेपन, पुर्वाभिमुख असून पद्यासनी बसलेली आहे.  खान्देश कुलस्वामिनी, आदिमाया, आदिशक्ती श्री एकविरा देवीचे धुळ्यात पांझरा नदीकाठी स्वयंभू स्थान म्हणून ओळखले जाते. दरम्यान आजच्या झालेल्या लिलावात दागिन्यांमध्ये पदक असलेला एक पदरी सोन्याचा चार लाख एक हजार 134 रुपयांचा हार, कैरीची नक्षी असलेला सोन्याचा 10 लाख नऊ हजार 710 रुपयांचा चारपदरी हार, पदक आणि कैरीची नक्षी असलेली तीन पदरी सोन्याची तीन लाख 16  हजार 485 रुपयांची बिंदी, चांदीचे नऊ हजार 60 रुपयांचे बाजूबंद, असे आजच्या बाजार भावाप्रमाणे सुमारे 17 लाख 36 हजार 389 रुपये किंमतीचे दागिने या लिलावात ठेवण्यात आले होते. 


इतर महत्वाची बातमी : 


Navratri 2022 : ‘शैलपुत्री’ ते ‘सिद्धिदात्री’, देवी दुर्गाच्या ‘या’ नऊ रूपांचा ‘नवरात्रोत्सव’!