Agriculture News : सणासुदीचा उत्साह सुरु झाला आहे. ऐकामागून एक सण येत आहेत. सध्या नवरात्रोत्सव सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर बाजार फुलांनी सजला आहे. फुलांना मोठी मागणी वाढली आहे. तसेच सध्या फुलांना बाजारात चांगला दर देखील मिळत आहे. त्यामुळं फुल उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. सध्या धुळे जिल्ह्यात फुलांना मोठी मागणी वाढली आहे.  


कालपासून (16 ऑक्टोंबर)  नवरात्र उत्सवा सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये फुलांना मागणी वाढली आहे. त्यामुळं फुल उत्पादक शेतकऱ्यांना बाजारामध्ये फुलाला चांगला दर मिळत आहे. भर पावसाळ्यामध्ये गेले तीन ते चार महिने पिकांना पाणी मिळाले नाही. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांची पिकं पाण्यावाचून शेतातच उभी जळून गेली आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नसल्यानं शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. अशातच सध्या मात्र नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात फुलांना चांगलीच मागणी वाढली आहे. त्यामुळं फुल उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर देखील मिळत असल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या बाजारात 100 रुपये किलो या दराने झेंडूच्या फुलांची विक्री होत आहे. दसऱ्यापर्यंत हे भाव 150 ते 200  रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर तसेच पावसामुळं झालेलं नुकसान यामुळे फुलांचे दर यंदा चांगलेच वाढल्याचे दिसून येत आहे. 


धुळे जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात फुलांची आवक 


धुळे जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात फुलांची आवक सुरु आहे. ही आवक नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून होत आहे. यामुळं एकीकडे फुल उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळत असला तरी दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांना फुले खरेदी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत.


राज्यातील बहुतांश शेतकरी आता पारंपारिक पिकांबरोबरच फळबागांचे उत्पादन वाढवण्यावर भर देत आहेत. मात्र फुल उत्पादकांना कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांना सामोरं जावं लागत आहे. यावर्षी फुल उत्पादक शेतकऱ्यांना कमी पावसाचा मोठा फटका बसला आहे. फुल शेती पिकांवर वाईट परिणाम झाल्यानं बाजारात फुलांची आवकही 30 ते 40 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळं फुलांचे भाव वाढले आहेत. झेंडूला किलोला 80 ते 100 रुपयांचा दर मिळत आहे. मात्र, पावसाचा फटका फुल शेतीला बसल्यामुळं शेतकऱ्यांकडे विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात फुलं नाहीयेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Flower Crops : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फुलांचा 'सुगंध' महागणार, अतिवृष्टीचा उत्पादनावर परिणाम, बाजारात आवक कमी