नाशिक : शिरपूर (Shirpur) तालुक्यातील लाकड्या हनुमान येथे आंतरपीक म्हणून गांजाची (Ganja) शेतीवर स्थानिक गुन्हा अन्वेषन शाखा व शिरपूर तालुका पोलीस पथकाने (Shirpur Police ) छापा टाकून 721 किलो 400 ग्रॅम वजनाचा तीन कोटी दहा हजार रूपये किंमतीचा ओला गांजा जप्त करण्यात आला. पोलिसांच्या छाप्यानंतर गांजाची शेती करणारे दोघे पसार झाले आहेत. त्यांच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई आजपर्यंतची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे.
काही दिवसांपूर्वीच तब्बल एक कोटींचा गांजा शिरपूर पोलिसांनी हस्तगत केला होता. त्यानंतर आज पुन्हा कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. धुळे (Dhule) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान येथे शेतात गांजाची लागवड केल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर शिरपूर पोलिसांनी पथक तयार केले. मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी काल सायंकाळी तेथे छापा टाकला असता शेतात तूर, मका व कापुस या पिकात मध्यभागी अंदाजे तीन ते सहा फुट उंचीचे एकुण 487 गांजाची रोपे मिळून आलेत. एकुण 721 किलो 400 ग्रॅम वजनाचा तीन कोटी दहा हजार रुपयांचा किंमतीचा ओला गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी गांजा लागवड करणारे मोहन शामा पावरा व भावसिंग भोंग्या पावरा दोन्ही रा.लाकड्या हनुमान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपी पसार झाले असून पोसई बाळासाहेब सूर्यवंशी यांनी पंचासमक्ष पंचनामा केला.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर (Shipur Taluka) तालुक्यातील लाकडा हनुमान गावाच्या एका शेतशिवारात प्रतिबंधित असलेला मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा गांजा सदृश्य अमली पदार्थांच्या वनस्पतीच्या झाडांची बेकायदेशीर रित्या लागवड केलेली असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने लाकडा हनुमान शिवारात धडक कारवाई करून या ठिकाणाहून तब्बल तीन कोटी दहा हजार रुपयांचा गांजा सदृश्य अमली पदार्थ जप्त केले असून ही गांजाची लागवड देवा कहारु पावरा याच्या शेतात तूर आणि कापूस या पिकात मध्यभागी लागवड करण्यात आली होती. धुळे जिल्ह्यातील गांजाच्या शेतीवर केलेली ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने केलेली आहे. या कारवाईमुळे अवैधरित्या गांजाची लागवड करणाऱ्यांच्या तंबूत घबराट निर्माण झाली आहे
शिरपूर तालुक्यात एक कोटींचा गांजा जप्त
काही दिवसांपूर्वी शिरपूर तालुक्यातील केल्याचे समोर आले होते. शिरपूर पोलिसांच्या पथकाने 56 लाख आठ हजार 750 रुपयांची एक हजार 602 किलो गांजाची तीन ते सहा फुट उंचीची झाडे जप्त केली होती. त्याचदिवशी दुसऱ्या एका घटनेत देखील पोलिसांनी कारवाई टाकत गांजाची झाडे जप्त करण्यात आली होती. यात एका घटनेत 50 लाख तर दुसऱ्या घटनेत 56 लाखांचा मुद्देमाल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. एकट्या शिरपूर तालुक्यात एक कोटींचा गांजा जप्त करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
इतर महत्वाची बातमी :