Dhule Accident : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात आणि जळगाव, धुळे नंदुरबारसह (Nandurbar) विभागात अपघात होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे रस्त्यावर सुरक्षित वाहन चालविणे किती महत्वाचे आहे हे यावरून लक्षात येत आहे. अशातच काही तासांपूर्वी बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण बस अपघातात 25 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच धुळ्यात आणखी दोन महिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


नाशिक जिल्ह्यात अपघाताच्या (nashik Accident) सातत्याने अपघात होत आहेत. अशातच धुळ्यात एक विचित्र अपघात झाला असून या भीषण अपघातात दोन महिलांचा जीव गमवावा लागला आहे. तर एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. रस्त्यावरून जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने चिरडल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातानंतर टपाल घेऊन जाणाऱ्या एका पोस्टमनची मृत्यूशी झुंज सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाची नोंद करत तपास सुरु केला आहे.


धुळे जिल्ह्यातील (Dhule District) दोंडाईचा शहरात हा भीषण अपघात झाला असून भरधाव वेगातील येणाऱ्या आयशर हा दुभाजकावर धडकल्याने उलटला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. रस्त्यावरून जात असलेल्या दोन महिला या आयशर खाली दबल्याने त्यांचा मृत्यू झाला. नयना विश्वास बोरसे आणि मंगलाबाई उर्फे मिठीबाई मराठे असे मृत महिलांची नवे आहेत. हा अपघात दोंडाईचा रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंदिरासमोर झाला असल्याची माहिती समोर येत आहे. अपघात इतका भीषण होता की, आयशरच्या केबिनचा पूर्णपणे चुराडा झाला. अपघातात चालकासह अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांना धुळे येथील जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. 


पोस्टमन गंभीर जखमी 


गुजरात राज्यातील बडोदा येथून कीटकनाशक घेऊन आयशर जळगावकडे जात होता. हा आयशर दोंडाईचा रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंदिरासमोर असलेल्या दुभाजकावर धडकला असल्याने हा अपघात झाला आहे. दरम्यान, या अपघातात पोस्टमन असलेले जयराम वाघ हे गंभीर जखमी झाले आहे. अपघातानंतर आयशर गाडीच्या ड्रायव्हर हा गाडीतच अडकून पडला होता. शिंदखेडा शहरवासियांनी अथक प्रयत्न करून दोन जेसीबीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढले. गाडीच्या चालकावर शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्याला प्रकृती गंभीर असल्याने धुळे येथे पाठवण्यात आले आहे.


इतर संबंधित बातम्या: