Agriculture News : वातावरणातील बदल (Climate Change), ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) याचा फटका उत्तर महाराष्ट्रातील रब्बी पिकांना (Rabi Crop) मोठ्या प्रमाणावर बसला आहे. नंदुरबारमध्ये (Nandurbar) ढगाळ वातावरणामुळे पिकांचं नुकसान झालं आहे, तर धुळ्यात (Dhule) अवकाळी पावसामुळे कापणीला आलेलं पीक आडवं झालं आहे. या सगळ्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. 


हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) तीन दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणाचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला आहे. तर दुसरीकडे नवापूर तालुक्यात जोरदार वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


वातावरण बदलामुळे रबी पिकांवर अळींचा प्रादुर्भाव


ढगाळ वातावरण आणि दाट धुके याचा परिणाम रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांवर होत असून हरभऱ्यावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. दुसरीकडे गहू आणि ज्वारी पिकावर वेगवेगळ्या वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होत असल्याने रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन घटनेचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. नवापूर तालुक्यात झालेल्या नुकसानीचे अजूनही पंचनामे सुरू झालेले नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


धुळ्यात कापणीला आलेले गव्हाचं पीक आडवे


धुळे (Dhule) तालुक्यातील मोराणे नेर परिसरात सोमवारी (30 जानेवारी) सायंकाळी उशिरा दहा ते पंधरा मिनिटे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली. या वाऱ्यामुळे रब्बी हंगामाच्या पिकांचे नुकसान झालं आहे. सर्वाधिक फटका गव्हासह हरभऱ्याच्या पिकाला बसला आहे. तर दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचे प्रमाण कमी झाले असले तरी धुक्याची चादर मोठ्या प्रमाणावर पसरल्याने याचा देखील फटका रब्बी हंगामाच्या पिकांना बसला आहे. या पावसामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणी गव्हाचे पीक (Wheat Crop) आडवे झाले आहे. अवघ्या पंधरा ते वीस दिवसांवर गव्हाची कापणी सुरू होणार होती, मात्र त्यापूर्वीच वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.


हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा अंदाज


हवामान विभागाने कालच (30 जानेवारी) राज्यात चार ते पाच दिवस सौम्य थंडी (Maharashtra Weather Update)  जाणवणार असल्याची शक्यता वर्तवली होती. तसंच नाशिक, धुळे, नंदुरबार, औरंगाबादसह आजूबाजूच्या जिल्ह्यांतील काही भागांत विजांच्या कडकडाटासह, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30-40 किमी वेगाने वाहणारे वारे वाहण्याचा अंदाजही व्यक्त होता


VIDEO : Nandurbar Rabi Crop : ढगाळ आणि बदलत्या वातवरणाचा रब्बी पिकांचं नुकसान, शेतकरी हवालदिल