Dhule Crime News : एटीएम (ATM) कार्ड बदलून पैसे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या टोळीकडून 94 एटीएम कार्डसह साडेचार लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. शिवाय टोळीतील चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

  


या टोळीतील चारही आरोपींवर राज्यातील विविध पोलिस ठाण्यात बारा गुन्हे दाखल आहेत. याबाबत पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली असून त्यांनी पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक देखील केलं आहे. पोलिसांच्या तपासात टोळीतील  एका आरोपीने फसवणुकीची पद्धत देखील सांगितली आहे.


मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळे येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरामध्ये काही तरूण मुंबई पासिंगच्या वाहनाने संशयितरित्या फिरत असल्याची खात्रीशीर माहिती काल सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दहिवद येथे जाऊन संशयितांचा आणि वाहनाचा शोध सुरु केला. त्यावेळी साखर कारखान्याजवळ एम एच 02 बी झेड 3439 गाडी आणि त्यात चार जण मिळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडे त्यांचे नाव, गाव विचारून त्यांचेकडे चौकशी केली असता ते उडवा उडवीची उत्तरे देवू लागले. पोलिसी हिसका दाखवितात त्यांनी त्यांची नावे सांगीतले. 


या टोळीतील सर्व आरोपी हे ठाणे जिल्ह्यातील आहेत. त्यावरुन त्यांची आणि वाहनाची तपासणी केली असता गाडीत 94 एटीएम कार्ड मिळून आले. हा सर्व मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, प्रभारी उपविभागीय अधिकारी अन्साराम आगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ भिकाजी पाटील, संदिप पाटील, संतोष पाटील, जयेश मोरे, इसरार फारुकी, योगेश मोरे, मुकेश पावरा तसेच महामार्ग सुरक्षा पथकातील प्रशांत देशमुख आणि देवेंद्र वेधे यांनी केली आहे. दरम्यान, या टोळीत आणखी कुणाचा सहभाग आहे का याबाबतचा तपास पोलिस करत आहेत अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. दरम्यान, नागरिकांनी एटीएमचा वापर करताना काळजीपूर्वक करावा, एटीएम कार्डसह त्याचा पीन नंबर कोणाला देखील कळू देऊ नये, असे आवाहन धुळे पोलिसांनी केले आहे. 


महत्वाच्या बातम्या


Pune Crime news: स्वत:च्याच घराला, गाडीला आग लावली अन् तमाशात जाऊन बसला; तरुणाचा प्रताप पाहून पोलीसही चक्रावले