एक्स्प्लोर

दुधाचं अनुदान मिळणार कधी? धाराशीवमधील शेतकरी आक्रमक, रस्त्यावर दूध ओतून केला सरकारचा निषेध

दुधाच्या दरात (Milk Price) घसरण झाली आहे. तर दुसऱ्या बाजुला सरकारनं जाहीर केलंलं 5 रुपयांचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालं नाही.  त्यामुळं धाराशीव (Dharashiv) जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.

Dharashiv News : सध्या राज्यातील दूध  (milk) उत्पादक शेतकरी (Farmers) चिंतेत आहेत. कारण, एका बाजुला दुधाच्या दरात (Milk Price) घसरण झाली आहे. तर दुसऱ्या बाजुला सरकारनं जाहीर केलंलं 5 रुपयांचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालं नाही.  त्यामुळं धाराशीव (Dharashiv) जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. धाराशिवमधील शेकडो दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतुन शासनाचा निषेध केला आहे. धाराशिवच्या जुनोनी गावातील दुध उत्पादकांनी अनुदान मिळाले नसल्याने आक्रमक पवित्रा घेतलाय.

दुध डेअरीसमोरच दूध ओतून निषेध

शेतकऱ्यांनी जुनोनी गावातील दुध डेअरीसमोरच दूध ओतून निषेध केला. दूध डेअरी चालकाने दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहीती, कागदपत्रे शासनाला कळवली नसल्याने अनुदान मिळाला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेकडो शेतकरी प्रति लिटर 5 रुपये शासकीय अनुदानापासुन वंचित आहेत. या शेतकऱ्यांना अनुदान कधी मिळणार? असा सवाल उपस्थित केला जातोय. 

काही भागात पाणी टंचाईचा प्रश्न

एकीकडे राज्यात अवकाळी पाऊस पडतोय तर दुसरीकडे काही भागात पाणी टंचाई जाणवत आहे. या पाणीटंचाईमुळं अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात सध्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासोबतच चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. कारण अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी नसल्यामुळं चारा उपलब्ध नाही. त्यामुळं जनावरं जगवायची कशी असा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालाय. दरम्यान, अशा स्थितीत देखील दुधाला कमी दर मिळत आहे. त्यामुळं शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत. 

दुधाच्या दरात घसरण झाल्यामुळं शेतकरी आक्रमक

 
राज्यात दुधाच्या दरात घसरण झाल्यामुळं शेतकरी आक्रमक झाले होते. विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलने सुरु केली होती. त्यामुळं सरकारनं या आंदोलनांची दखल घेत पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गाईचे दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना दर पडलेल्या काळात प्रतिलिटर 5 रुपयांचे अनुदान  देण्याची योजना जाहीर केली होती. शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करुन सरकारनं एक प्रकारचा दिलासा देणयाचा प्रयत्न केला होता. मात्र, अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले नाही. त्यामुळं पाच रुपयांचे अनुदान जमी कधी होणार? असा सवाल शेतकरी करताना दिसत आहे. अनुदान मिळालं नसल्यामुळेच धाराशीव जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहे. या शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध केला आहे. 
 

 

महत्वाच्या बातम्या:

महाराष्ट्राच्या महानंदवर अखेर मदर डेअरीचा ताबा, हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण, दूध संस्थांची शिखर संस्था मोडीत

 

महत्त्वाच्या बातम्या

Kailas Patil on Sanjay Shirsat: आम्ही थांबवलं नसतं तर त्यांचं रामनाम सत्य झालं असतं, संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर कैलास पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले...
आम्ही थांबवलं नसतं तर त्यांचं रामनाम सत्य झालं असतं, संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर कैलास पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले...
सुप्रीम कोर्टाचा विमा कंपन्यांना दणका! नाकारलेले 227 कोटी रुपये देण्याचे निर्देश, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा
सुप्रीम कोर्टाचा विमा कंपन्यांना दणका! नाकारलेले 227 कोटी रुपये देण्याचे निर्देश, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा
Dharashiv Crime: आठ महिन्यांपूर्वीच लग्न, अन् पतीच्या सख्ख्या मावसभावावर जीव जडला; प्रेमसंबंधात अडसड ठरणाऱ्या पत्नीनेच मावसदिराच्या मदतीने पतीचा बळी घेतला; धाराशिव हादरलं!
आठ महिन्यांपूर्वीच लग्न, अन् पतीच्या सख्ख्या मावसभावावर जीव जडला; प्रेमसंबंधात अडसड ठरणाऱ्या पत्नीनेच मावसदिराच्या मदतीने पतीचा बळी घेतला; धाराशिव हादरलं!
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Athawale on Sharad Pawar : 2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
BJP-SAD Alliance Punjab : मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!
मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!
Solapur Election News: सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीमुळे घडामोडींना वेग; आरोप अन् प्रत्यारोप; पुन्हा गोरे विरुद्ध मोहिते पाटील टोलेबाजी, नेमकं काय घडलं?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीमुळे घडामोडींना वेग; आरोप अन् प्रत्यारोप; पुन्हा गोरे विरुद्ध मोहिते पाटील टोलेबाजी, नेमकं काय घडलं?
Paper Leak Case: पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
Pune News: आधी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा बहाणा, नंतर 10 कोटीत आदिवासींची जमीन देण्याची ऑफर; पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह मुलगा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय प्रकरण?
आधी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा बहाणा, नंतर 10 कोटीत आदिवासींची जमीन देण्याची ऑफर; पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह मुलगा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय प्रकरण?
Devendra Fadnavis on Sharad Pawar retirement speculations: 12 डिसेंबरला शरद पवार राजकारणातून निवृत्त होण्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
12 डिसेंबरला शरद पवार राजकारणातून निवृत्त होण्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
Gold Silver Rate: सोन्याचे दर 'जैसे थे', पण चांदी 3000 रुपयांनी महागली; लग्नसराईत दरांकडे लक्ष, जाणून घ्या आजचे सोने चांदीचे भाव
सोन्याचे दर 'जैसे थे', पण चांदी 3000 रुपयांनी महागली; लग्नसराईत दरांकडे लक्ष, जाणून घ्या आजचे सोने चांदीचे भाव
Supriya Sule on Sharad pawar Retirement: शरद पवारांच्या निवृत्तीच्या बातमीवर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या 'निवृत्तीच्या बातम्या येत असतील तर...'
शरद पवारांच्या निवृत्तीच्या बातमीवर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या 'निवृत्तीच्या बातम्या येत असतील तर...'
Embed widget