एक्स्प्लोर

Tuljapur Temple : तुळजाभवानीच्या दरबारात दान की लूट? चुकून दानपेटीत पडलेली वस्तू परत मिळणार नाही

Tulja Bhavani Temple : एका भाविकाची सोन्याची अंगठी चुकून दानपेटीत पडली. मात्र मंदिर प्रशासनाने जुन्या ठरावाचा आधार घेत ती अंगठी परत देण्यात नकार दिला. 

धाराशिव : तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या (Tulja Bhavani Temple) एका अजब ठरावामुळे सध्या खळबळ माजली आहे. तुळजाभवानीच्या चरणी अनेकवेळा भाविक मोठ्या संख्येनं दान करतात. मात्र दान करतेवेळी दानपेटीत चुकून पडलेली वस्तू परत न देण्याचं फर्मान मंदिर प्रशासनानं काढलं आहे. याच ठरावाचा फटका एका भविकाला बसला आहे. पण या ठरावामुळे भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे. 

पिंपरी चिंचवडचे रहिवासी असलेले सूरज टिंगरे दोन महिन्यांपूर्वी मोठ्या भक्तीभावाने तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले. मंदिरात पोहोचताच देवीला मनोभावे नमस्कार करत प्रार्थनाही केली. मग दक्षिणा पेटीत देवीला दान दिलं. पण दानपेटीत पैसे टाकताना त्यांच्या बोटातली सोन्याची अंगठीही चुकून दानपेटीत अपर्ण झाली. 

ही गोष्ट लक्षात आल्यावर टिंगरेंनी धाव घेतली मंदिर प्रशासनाकडे. जवळपास एक तोळ्याची ही सोन्याची अंगठी परत मिळण्यासाठी टिंगरेंनी रितसर अर्जही दाखल केला. पण दानपेटीत चुकून पडलेली वस्तू परत न देता ती दान समजली जाईल असं सांगत मंदिर समितीने सुरज टिंगरेंचा अर्जही फेटाळला आणि अंगठीही परत देण्यास नकार दिला. पण तुळजापूर मंदिर प्रशासनाच्या या अजब कारभारामुळे भक्तमंडळींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.  

Tuljapur Temple : 2017 सालीच ठराव संमत

दानपेटीतल्या दानासंदर्भात तुळजापूर संस्थानने 31 ऑगस्ट 2017 साली एक ठराव संमत केला आहे. त्या ठरावानुसार देवीच्या दानपेटीत भक्तांनी नजरचुकीने टाकलेल्या मौल्यवान वस्तू भक्तांना परत करण्यास मज्जाव केला गेला.

दानपेटीत भक्तांकडून चुकून पडलेल्या वस्तुंनाही दान समजलं जाईल. पण भाविकाचा मोबाईल दानपेटीत पडल्यास भाविकाच्या विनंतीनंतर, ओळख पटवून तहसीलदार आणि व्यवस्थापक प्रशासन यांच्या परवानगीनेच तो परत केला जाईल. 

Tuljapur Mandir : ठराव मागे घेण्याची मागणी

मंदिर संस्थानने केलेल्या याच ठरावानुसार दानपेटीत पडलेली कोणतीही वस्तू परत देता येणार नाही, असे लेखी उत्तर सूरज टिंगरे यांना देण्यात आले आहे. पण या निर्णयामुळे भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोप होत आहे. मंदिर संस्थानने हा ठराव तात्काळ रद्द करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे आणि यासाठी पुजारी मंडळ देखील मैदानात उतरलं आहे.

कोणताही भक्त देवाच्या दारात श्रद्धा आणि विशावासाने जातो. आपल्या आयुष्यातली विघ्नं दूर व्हावीत यासाठी प्रार्थना करतो. पण देवाच्या दरबारातल्या नियमांमुळेच त्याला मनस्ताप होणार असेल तर दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे देवीच्या दरबारात आलेल्या भाविकाला न्याय मिळणार की ठरावाच्या नावाखाली त्याची फसवणूक होणार, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dharashiv Fire Incident News: पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
Dharashiv Fire Incident News: दिवाळीसाठी दोन्ही मुली गावी आल्या; संपूर्ण कुटुंबीयांसह आगीत होरपळल्या; धाराशिवमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
दिवाळीसाठी दोन्ही मुली गावी आल्या; संपूर्ण कुटुंबीयांसह आगीत होरपळल्या; धाराशिवमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
Dharashiv Fire Incident News: हातोड्याने भिंती फोडल्या, किंचाळणारा आवाज 15 मिनिटांनी शांत झाला; आगीत 6 जणांचा मृत्यू, धाराशिवमधील अंगावर काटा आणणारी घटना
हातोड्याने भिंती फोडल्या, किंचाळणारा आवाज 15 मिनिटांनी शांत झाला; आगीत 6 जणांचा मृत्यू, धाराशिवमधील अंगावर काटा आणणारी घटना
Dharashiv Fire Incident News: धाराशिवमध्ये घराला लागलेल्या आगीत सहा जणांचा गुदमरुन मृत्यू, किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणारं कुटुंब मृत्युच्या खाईत
धाराशिवमध्ये घराला लागलेल्या आगीत सहा जणांचा गुदमरुन मृत्यू, किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणारं कुटुंब मृत्युच्या खाईत

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
Embed widget