Sugarcane News : ऊसाच्या थकीत एफआरपीच्या (FRP) मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना (swabhimani shetkari sanghatana) आक्रमक झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडील थकीत एफआरपीची रक्कम तात्काळ शेतकर्‍यांना मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बँड बजाओ आंदोलन केलं. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. धाराशिव जिल्ह्यातील 8 साखर कारखान्यांकडे एफआरपीचे 90 कोटी रुपये थकीत आहेत.


शेतकर्‍यांनी गाळपासाठी दिलेल्या ऊसाला एफआरपीप्रमाणं दर मिळत नसल्याचे स्पष्ट होत असून साखर कारखाने दर 15 दिवसाला साखर आयुक्त कार्यालयाला सादर करीत असलेल्या एफआरपीच्या माहितीविषयी शंका निर्माण होत आहे. त्यामुळं साखर आयुक्तांचे या प्रकारांवर नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


साखर सहसंचालकांकडील आकडेवारीनुसार 15 फेब्रुवारीपर्यंतची स्थिती काय?


धाराशिव जिल्ह्यातील मुरुम येथील विठ्ठलसाई साखर कारखान्याकडे 28.29 कोटी थकीत


 भैरवनाथ (सोनारी) 20.64 कोटी 


 लोकमंगल माऊली 13.46 कोटी 


भैरवनाथ (तेरणा) 18.40 कोटी 


गोकुळ शुगर 12.54 कोटी 


भैरवनाथ (शिवशक्ती) 6.07 कोटी 


क्युएनर्जी 0.43 कोटी, 


भीमाशंकर 0.10 कोटी 


अशी एकुण 90 कोटी रुपये एफआरपीची थकीत  रक्कम शेतकर्‍यांना मिळावी या निवेदनाद्वारे मागणी करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बँड वाजवून आंदोलन करण्यात आले.


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! केंद्र सरकारनं निर्णय बदलला, इथेनॉल निर्मितीला हिरवा कंदील; ऊस उत्पादकांसह कारखानदारांना मोठा दिलासा