Dharashiv:भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता अशी ओळख असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या भाईची दहशत सोशल मीडिया वरून व्हायरल झाल्यानंतर आधी वनविभागाची कारवाई आणि नंतर 14 दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली . याचवेळी धाराशिवात मात्र,सतीश भोसले खोक्या नाही तर आमचा विठ्ठल असे म्हणत  मित्रांच्या हातावर विठ्ठल नावाचे टॅटू काढलंय .सतीश भोसलेची चुकीची प्रतिमा तयार केल्याचा आरोप करत त्याच्या कुटुंबीयांच्या समर्थनार्थ आदिवासी समाज आक्रमक झाला आहे .वनविभागाकडून केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ तुळजापुरात आदिवासी समाजाने रास्ता रोको केलाय .या रास्ता रोको ला दलित पॅंथरचा ही सक्रिय पाठिंबा आहे .(Satish Bhosle)


वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,सतीश भोसलेचा जातीवाचक उल्लेख करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा तसेच सतीश भोसले यांच्या कुटुंबीयांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे.राजकीय उट्टे काढण्यासाठी सतीश भोसलेला टार्गेट केल्याचा आरोपही आदिवासी समाजातून करण्यात आलाय . (Khokya)


नक्की प्रकरण काय?


शिरूरमधील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने सतीश भोसले उर्फ खोक्याची दहशत चर्चेचा विषय बनली .गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सतीश भोसले विरोधात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे .यात मारहाण प्राणघातक हल्ला, फसवणूक,खुनाचा गुन्हा असे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत .काही दिवसांपूर्वीच वनविभागाच्या जागेवर दुमजली इमारत आणि त्या बाजूला आलिशान ऑफिसमधून सतीश भोसले चालवत असल्याचे लक्षात आल्यानंतर वनविभागाने सतीश भोसले उर्फ खोक्याच्या अनधिकृत घरावर तसेच ऑफिसवर बुलडोझर चालवला होता . तसेच शिरूर दिवाणी व फौजदारी न्यायालयात त्याला हजर केले असता सतीश भोसलेची रवानगी न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांसाठी करण्यात आली होती . दरम्यान काही दिवसांपूर्वी सतीश भोसले चे वाढलेले घर अज्ञातांनी पेटवून दिल्याची घटना घडली होती .यात त्याच्या घरातील जीवनावश्यक वस्तू ,जनावरांचा चारा ही खाक झाला व घराचही मोठं नुकसान झालं होतं .  दरम्यान सतीश भोसले च्या कुटुंबातील महिलेला मारहाण केल्याची घटनाही घडली होती .या घटनेनंतर आता धाराशिव मध्ये सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबीयांच्या समर्थनार्थ आदिवासी समाज आक्रमक झाला आहे .वनविभागाकडून सतीश भोसले च्या घरावर करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ तुळजापुरात रास्ता रोको करण्यात आलाय .वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी . सतीश भोसले च्या जातीवाचक उल्लेख करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येत आहे . सतीश भोसले खोक्या नाही तर आमचा विठ्ठल असल्याचे  म्हटले जात आहे . त्याच्या मित्रांच्या हातावर विठ्ठल नावाचे टॅटू आहे .सतीश भोसले ची चुकीची प्रतिमा तयार केल्याचा आरोपही होतोय .


 



हेही वाचा:


Chhatrapati sambhaji nagar crime: 'दीडशहाण्या तुझा कार्यक्रमच करतो, माझ्याकडे रिव्हॉल्व्हर आहे', माजी आमदाराच्या मुलाची धमकी; सरकारी अधिकारीही शेवटपर्यंत नडला, म्हणाला....