एक्स्प्लोर

शिंदे गटातील नाराज दहा आमदार ठाकरे गटात जाण्यास उत्सुक; रोहित पवारांचा दावा

Rohit Pawar : शिंदे गटातील नाराज दहा आमदार आणि इतर पाच असे एकूण 15 आमदार ठाकरे गटात जाण्यास उत्सुक.

Rohit Pawar On Shinde Group: मागील काही दिवसांत शिंदे गटात सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे. कोणी मंत्री पदावरून,कोणी पालकमंत्री पदावरून, तर कोणी विकास निधी मिळत नसल्याच्या कारणांवरून नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे गटाचे काही आमदार पुन्हा ठाकरे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उस्मानाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलतांना मोठं वक्तव्य केले आहे. शिंदे गटात मोठी नाराजी असून, शिंदे गटातील नाराज दहा आमदार आणि इतर पाच असे एकूण 15 आमदार ठाकरे गटात जाण्यास उत्सुक असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत. 

दरम्यान यावेळी बोलतांना रोहित पवार म्हणाले की, सत्तेत सहभागी असलेल्या शिंदे गटातील काही आमदार नाराज आहे. तर, शिंदे गटाचे 10 आणि इतर 5 असे एकूण 15 आमदार नाराज आहेत. तर नाराज असलेले हे सर्व आमदार ठाकरेंकडे जाण्यास इच्छुक आहेत. पण त्यांना पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत घ्यायचे की नाही, हा निर्णय तेच घेतील, असे आमदार रोहित पवार म्हणाले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गटातील नाराजीची चर्चा पाहायला मिळत आहे. 

सर्वकाही आलबेल नाही... 

सध्या राज्यात जे सरकार आहे, ते पक्षांमध्ये गट-तट पाडून निर्माण झाले आहे. त्यामुळे या सरकारला लोकांमधील नाराजीचा विचार करायला वेळ नाही. कारण त्यांच्याच गटातीलच अनेक आमदार नाराज आहेत. शिंदे गटात सर्वकाही आलबेल आहे, असे नाही. शिंदे गटाचे जवळपास दहा आमदार नाराज आहेत. याबाबत माझ्याकडे माहिती आहे. शिंदे गटासह इतर असे एकूण पंधरा आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्यास उत्सुक आहेत. तर, राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे शरद पवार यांच्याकडेच राहील, असा आम्हाला विश्वास आहे, असेही रोहित पवार म्हणाले.

शिंदे गटामध्ये कुजबूज 

शिंदे गटामध्ये काही आमदार रोहित पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली होती. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, शिंदे गटांमध्ये सध्या कुजबूज सुरू आहे. लवकरच या संदर्भातल्या काही घटना येत्या काळामध्ये घडणार असल्याचं वक्तव्य रोहित पवार यांनी बीडमध्ये बोलतांना केले आहे. तर, येत्या काळामध्ये शरद पवार यांच्या विचारांचा विजय होईल असा विश्वास देखील रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

शरद पवारांच्या विचारामुळे बीड जिल्ह्याच्या मतदारांनी चार आमदारांना निवडून दिलं : रोहित पवार

महत्त्वाच्या बातम्या

Sayaji Shinde On Omraje Nimbalkar: ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Pratap Sarnaik on Eknath Shinde: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, स्वातंत्र्यदिनी प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली इच्छा; म्हणाले, 'भविष्यात शिवसेनेचे आमदार अन् खासदार...'
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, स्वातंत्र्यदिनी प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली इच्छा; म्हणाले, 'भविष्यात शिवसेनेचे आमदार अन् खासदार...'

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget