Osmanabad Suicide News : उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका 22 वर्षीय परप्रांतीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. विशेष म्हणजे 'इन्स्टाग्राम'वर (Instagram) लाईव्ह येत या तरुणीने घेतला गळफास घेतला. उमरगा तालुक्यातील जकेकूर चौरस्ता येथील अंबिका हॉटेलमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. या तरुणीने 'इन्स्टाग्राम'वर लाईव्ह येत गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. तर ही धक्कादायक घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली असून, याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुरुवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु आहे. तर यमत उर्फ राणी दोमन हासदा (वय 22 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. 


अधिक माहिती अशी की, उमरगा शहरापासून जवळच असलेल्या जकेकूर चौरस्ता भागात अंबिका हॉटेल आहे. याच हॉटेलमध्ये बुधवारी रात्रीच्या सुमारास झारखंड येथील रायमत उर्फ राणी दोमन हासदा (वय 22 वर्षे) या युवतीने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान ही घटना निदर्शनास येताच हॉटेल चालकाने याची माहिती उमरगा पोलिसांना दिली. तर याबाबत माहिती मिळताच अवघ्या काही क्षणातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. रात्री उशिरा शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह तरुणीच्या मूळ गावी झारखंडला पाठवण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 


दरम्यान या प्रकरणी मयत तरुणीची मैत्रीण राधिका राजेश कश्यप (रा. दिल्ली) हिच्या तक्रारीवरुन उमरगा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद गुरुवारी करण्यात आली. दरम्यान, मयत तरुणी परराज्यातील अंबिका हॉटेलवर कशासाठी आली होती, ती कधीपासून राहात होती, तिने आत्महत्या का केली, हे प्रश्ना अनुत्तरितच आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. 


आत्महत्येचे कारण अस्पष्ट...


राणी या परप्रांतीय तरुणीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. राणीने आत्महत्या का केली याबाबत कोणतेही कारण समोर आलेले नाही. त्यामुळे पोलिसांकडून याबाबत तपास सुरु आहे. मात्र राणीने 'इन्स्टाग्राम'वर लाईव्ह येऊन आत्महत्या का केली असावी असा प्रश्न उपस्थित होत. तसेच ती झारखंडमधून येथे कशासाठी आली होती. सोबतच हॉटेलमध्ये ती कधीपासू थांबली होती आणि कशासाठी याचाही तपास पोलीस करत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Terna Dam Water Storage : उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 'तेरणा'त केवळ 27 टक्के पाणीसाठा शिल्लक