धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात चक्क वेठबिगारीचा प्रकार समोर आला आहे. एका कंत्राटदारानं चक्क 11 मजुरांना साखळदंडानं बांधून ठेवलं होतं. धाराशिव जिल्ह्यातील ढोकी आणि खामसवाडी परिसरातला प्रकार आहे. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी तात्काळ छापा टाकला.तेव्हा पोलिसांना 11 मजूर साखळदंडाने बांधलेले आढळून आले. 


धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातला हा कंत्राटदार असून त्याने हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर इथून शेतमजूर आणले होते. हे मजूर दिवसभर विहिरीवर काम करत होते. रात्रीच्या वेळेला या मजुरांनी पळून जाऊ नये म्हणून त्यांना साखळदंडाने बांधून ठेवलं जात होतं. शौचास जायचं असेल किंवा जेवण करायचं असेल तरी या मजुरांना परवानगी दिली जात नव्हती. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळेला हे मजूर घाबरलेल्या अवस्थेत साखळदंडाने बांधलेले आढळून आले. पोलिसांनी त्यांची सुटका केली आणि शनिवारी रात्री हे मजूर आपल्या गावी परत गेले.


पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा टाकला आणि मजुरांची सुटका केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदिप रामकिसन घुकसे (वय 23 वर्षे रा. कवठा, ता. सेनगाव जि. हिंगोली) यास बळजबरीने पकडून ठेवले असून त्याच्याकडून दिवसभर विहिरीचे काम करुन घेतात. मिळालेल्या माहितीवप मिळाल्यावरुन अतुल कुलकर्णी यांनी एक पथक तयार केले. या पथकाने मिळालेल्या ठिकाणी जाऊन शेध घेतला असता त्याठिकाणी  भगवान अशोक घुकसे, (26 वर्षे, रा. कवठा ता. सेनगाव जि. हिंगोली)यांच्यासह मारुती पिराजी जटाळकर (वय 40 वर्षे,रा. आतकुर, ता. धर्माबाद), राजू गनुलाल म्हात्रे (वय 22 वर्षे रा मध्येप्रदेश), मंगेश जनार्दन कानटजे (वय 26 वर्षे, रा. कुलमखेड, मा. बुलढाणा, बालाजी  शामराव वाघमारे (वय 32 वर्षे, रा.लिंबा, ता. देगलूर जि. नादेंड), गणेश अशोक पवार,(वय 30 वर्षे, रा. नाशिक) साखळदंडाने बांधलेले आढळून आले.


वाखरवाडी येथील मजुरांकडे चौकशी केली त्यांनी माहिती दिली की, संतोष शिवाजी जाधव(गुतेदार)   दिवसा बळजबरीने विहीरीवर आमच्याकडून काम करुन घेत असे. त्यानंतर संध्याकाळी पळून जाऊ नये म्हणून हाता पाय साखळीने ट्रॅक्टरला बांधून ठेवत असे पोलीस स्टेशन ढोकी हद्दीतील व शिराढोण हद्दीतून एकूण अकरा इसमांची सुटका करुन पोलीस स्टेशन ढोकी येथील पोलीस पथकाने आणि पोलीस मित्र विशाल कानगे यांनी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कामगिरी केली आहे. ढोकी हद्दीत कोणी संशयीतरित्या दिसल्यास किंवा काही माहिती मिळाल्यास त्याबाबतची माहिती पोलीस स्टेशन ढोकी येथे द्यावी असे आवाहन केले आहे