Dharashiv Accident News : धाराशिवचे  माजी अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन (Gauhar Hasan ) यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. सोलापूर धुळे महामार्गावर धाराशिव शहराजवळ स्कॉर्पिओ गाडी आणि कंटेनरचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये गौहर हसन यांच्यासह इतर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींवर धाराशिवच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात स्कॉर्पिओ गाडीचे नुकसान झाले आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवचे  माजी अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. यामध्ये ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर धाराशिवच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. माजी प्पर पोलीस अधिक्षक गौहर हसन यांच्या डाव्या हाताला मार लागला आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. 


मुंबई गोवा महामार्गावर खेडमध्ये दोन ट्रकमध्ये जोरदार धडक


मुंबई गोवा महामार्गावरील खेडमधील खोपी फाट्याजवळ दोन ट्रकमध्ये जोरदार धडक झाली आहे. या धडकेत ट्रकच्या केबिनला जोरदार धक्का बसल्याने चालक केबिनमध्ये अडकला आहे.
सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या.


महत्वाच्या बातम्या:


Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एका महिलेचा जागीच मृत्यू; तीन चिमुकल्यांसह पाच जण जखमी