Dharashiv: ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी सुरेश कुटेला 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे . आरोपी सुरेश कुटेंचा धाराशिव पोलिसांनी ताबा घेतल्यानंतर कळंब येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली . सुनावणी दरम्यान पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली होती मात्र न्यायालयाने सहा दिवसांचे कोठडी मंजूर केली आहे .
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात बीड, छत्रपती संभाजीनगर, मुंबई- पुण्यातील शाखांमधून ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये बुडवल्याचा आरोप आहे . 7 जून 2024 रोजी ज्ञानराधा मल्टीस्टेट चे सुरेश कुठे व आशिष पाटोदेकर या दोघांना माजलगाव पोलिसांनी अटक केली होती .
सुरेश कुटेवर 80 लाखांच्या अपहाराचा आरोप
पोलिसांच्या प्राथमिक तपासनुसार आरोपी सुरेश कुटेने 80 लाखांचा लाखांचा अपहार केला असून अपहार केलेली रक्कम कुठे गेली याचा पोलिस तपास करणार आहे .ही रक्कम नेमकी कुठे वापरली हस्तांतरित कोणाला करण्यात आली याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे .एम्पीआयडी कारवाईसाठी धाराशिव जिल्ह्यात आरोपीची प्रॉपर्टी कुठे आहे ? याचा शोधही पोलीस घेत आहेत .दरम्यान आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना या आर्थिक या गैरव्यवहार प्रकरणात ईडीने आधीच कारवाई केली आहे .संबंधित प्रॉपर्टी ही अंमलबजावणी सक्तवसुली संचालनालयाने जप्त केली असल्याने आरोपी सुरेश कुटेला अतिरिक्त कोठडीची आवश्यकता नाही .मात्र पोलिसांना तपासासाठी काही महत्त्वाचे पुरावे गोळा करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आल्यानंतर कोर्टाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे .
ज्ञानराधा मल्टीस्टेट आर्थिक घोटाळा प्रकरणात लाखो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची मोठी फसवणूक झाल्याचा आरोप आहे .त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून आरोपीकडून आणखी किती लोकांची फसवणूक झाली आहे ? आरोपीची संपत्ती आणखी कुठे कुठे आहे ?याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे .
या पतसंस्थेवर 42 हून अधिक गुन्हे
मराठवाड्यातील उद्योग क्षेत्रात बडे प्रस्थ असलेल्या सुरेश कुटे यांची ज्ञानराधा मल्टीस्टेट पथसंस्था नोव्हेंबर 2023 मध्ये अडचणीत आली. या पतसंस्थेवर प्राप्तिकर विभागाच्या छाप्यानंतर तीन लाख 70 हजार ठेवीदार, खातेदारांचे 3700 कोटी रुपये या पतसंस्थेत अडकले आहेत. या प्रकरणात या पतसंस्थेवर 42 हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या 50 शाखांचे मागच्या वर्षीचा ऑक्टोबर महिन्यापासून आर्थिक व्यवहार ठप्प असल्याचं सांगितलं जातंय. ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील इंदोर आणि अन्य ठिकाणी 50 शाखा असून साडेसहा लाख खातेदार आहेत.
हेही वाचा: