एक्स्प्लोर

‘युगांक’... 120 दिवसात येणाऱ्या कापसाच्या नव्या प्रजातीचा शोध!

नागपूर: कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूटने एक आगळवेगळं संशोधन केलं आहे. त्यामुळे आता कापसाचं पिक चक्क 100 ते 120 दिवसात येणार आहे. आतापर्यंत कापसाचं पीक येण्यासाठी 170 ते 240 दिवस लागत होते. मात्र, नव्या संशोधनानं फार अमूलाग्र बदल होणार आहे. दरम्यान, कापसाच्या या नव्या जातीला ‘युगांक’ असं नाव देण्यात आलं आहे. कापसाचं पीक येण्यासाठी जास्तीत जास्त 240 दिवस लागत असल्यानं शेतकऱ्याचा खर्च वाढतो. मात्र, आता या कापसाच्या नव्या बियाण्यामुळे शेतकऱ्याचा खर्च आणि श्रम दोन्ही वाचणार आहेत. विदेशात अनेक ठिकाणी कापूस हा 140 ते 150 दिवस येतो. मात्र हे संशोधन जर शेतापर्यंत पोहचले तर शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो.   काही संशोधनं ही समाजजीवनच बदलू शकतात. असंच एक संशोधन नागपूरमध्ये झालं आहे. हे संशोधन नागपूरमधील सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च ह्या संस्थेच्या संतोष एच बी ह्या तरुण संशोधकानं केलं आहे. गेली चार वर्ष तो या संशोधनावर काम करत होता. त्यानंतर त्यानं 100 ते 120 दिवसात पूर्णत्वाला येणाऱ्या कापसाची प्रजाती तयार केली. भारताच्या दृष्टीने हे संशोधन अत्यंत मोठे आहे. कारण भारतात आजही कापसाला २४० दिवस लागतात. चार वर्षाच्या संशोधनात गेली दोन वर्ष या पिकाची सातत्याने चाचणी केली जात होती. या दोनही चाचणीमध्ये कापसाचं पीक १२० दिवसात ते पूर्णत्वाला आलं. मात्र, असं असलं तरी याची आणखी चाचणी होणार आहे. आतापर्यंत नागपूर आणि कोईम्बतूर इथं या पिकांची चाचणी झाली. मात्र, आता देशभरातील १७ ठिकाणी या पिकांची चाचणी होणार आहे. त्यामुळे थेट शेतकऱ्यापर्यंत हे बियाणं पोहचायला काही वेळ लागू शकतो. ...म्हणून कापसाच्या नव्या प्रजातीला ‘युगांक’ नाव! दरम्यान, या नव्या प्रजातीवर धारवाडमधील कापूस संशोधक एस एस पाटील यांनी संशोधन सुरु केलं होतं. त्यांनी आपलं हे संशोधन कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूटला दिलं होतं. मागील वर्षी पाटील यांच्या मुलाचं अचानक निधन झालं. त्यामुळे कापसाच्या या नव्या प्रजातीला एस एस पाटील यांच्या मुलाचं 'युगांक' हे नाव देण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 August 2026: आजचा श्रावणी सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
पुणे शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला देत मंगेश चिवटेंना उमेदवारी मिळावी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना साकडे घालणार, शिवसेनेच्या दोन आमदारांची ग्वाही
पुणे शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला देत मंगेश चिवटेंना उमेदवारी मिळण्यासाठी दोन आमदार प्रयत्नशील
मुसळधार पावसामुळं झोपड्यांवरच कोसळला कचऱ्याचा डोंगर, तब्बल 22 जणांचा जागीच मृत्यू, अेनकजण जखमी, बचावकार्य सुरु 
मुसळधार पावसामुळं झोपड्यांवरच कोसळला कचऱ्याचा डोंगर, तब्बल 22 जणांचा जागीच मृत्यू, अेनकजण जखमी, बचावकार्य सुरु 
Japan Earthquake : जपानमध्ये तासाभरात दोन वेळा भूकंप, टोक्यो, होक्काइडोमध्ये भूकंपाचे धक्के, 30 जण जखमी
जपानमध्ये तासाभरात दोन वेळा भूकंप, टोक्यो, होक्काइडोमध्ये भूकंपाचे धक्के, 30 जण जखमी

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget