छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील तब्बल 119 शाळांच्या मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येण्याची माहिती पुढे आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या शाळांकडून कर्मचाऱ्यांची माहिती प्रशासनाला देण्यात आली नसल्याने ही कारवाई केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhajinagar) जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या कडून हा कारवाईचा बडगा उभारण्यात आला असून या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा


मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवडणुकीच्या कामासाठी सर्व सरकारी कार्यालये,  शासकीय आणि खासगी अनुदानित शाळांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांची माहिती मागवण्यात आली होती. ज्यात जिल्ह्यातील 119 शाळांनी आपल्या शिक्षकांच्या याद्या आणि त्यांची माहिती सादर केली नाही. त्यामुळे आता या शाळांच्या मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे. त्यामुळे या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून प्रत्यक्षात नेमकी कधी कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


10 रुपयांसाठी कैचीने वार करत एकाची निर्घृण हत्या


ताश पत्ते खेळत असताना झालेल्या क्षुल्लक वादातून अवघ्या दहा रुपयांसाठी कैचीने वार करत एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस स्टेशन हद्दीतील बाबाटोली परिसरात ही घटना घडली आहे. अरबाज अहमद शाह (वय 25 वर्ष) असे मृतकाचे नाव आहे. तर अलीफ खान असे संशयित आरोपीचे नाव आहे. मृतक व आरोपीचे दोघेही भटक्या समाजातील असून रेल्वे स्थानक परिसरामध्ये सध्या वास्तव्यास आहेत. रात्री ताश पत्ते खेळत असताना दहा रुपयावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की कैचीने संशयित आरोपी अलिफ खान याने अरबाज शाह वर वार केले. यातच अरबाज अहमद शाह चा मृत्यू झाला.  घटनेची नोंद सालेकसा पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सध्या सुरू आहे. मात्र या घटणेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  तर सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. 


हे ही वाचा