एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
औट घटकेचे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसांच्या नावावर दोन नवे विक्रम
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून चार वेळा पदावर बसण्याचा मान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावावर आहे. तर वसंतदादा पाटील 2 वेळा, विलासराव देशमुख 2 वेळा मुख्यमंत्री झाले. त्यांच्यानंतर दोन वेळा मुख्यमंत्री होण्याचा मान देखील फडणवीस यांनी मिळवला आहे.
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतलेले देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा शपथ घेण्याचा बहुमान मिळवला असला तरी त्यांच्या नावावर महाराष्ट्राचे सर्वात कमी काळासाठी राहिलेले मुख्यमंत्री ठरले आहेत. साडेतीन दिवसाचे मुख्यमंत्री होण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर नोंद झाला आहे. तर देशातील सर्वात कमी काळासाठी असलेले तिसरे मुख्यमंत्री ठरले आहेत.
याआधी मारोतराव कन्नमवार यांचे मुख्यमंत्री पदावर असताना निधन झाल्यानंतर पी के सावंत हे 9 दिवसांसाठी मुख्यमंत्री होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे 80 तासासाठी मुख्यमंत्री झाले. पी के सावंत यांच्यानंतर वसंतराव नाईक हे तब्बल 11 वर्षांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून चार वेळा पदावर बसण्याचा मान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावावर आहे. तर वसंतदादा पाटील 2 वेळा, विलासराव देशमुख 2 वेळा मुख्यमंत्री झाले. त्यांच्यानंतर दोन वेळा मुख्यमंत्री होण्याचा मान देखील फडणवीस यांनी मिळवला आहे. वसंतराव नाईक यांच्यानंतर फडणवीस हे पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करणारे मुख्यमंत्री ठरले आहेत. फडणवीस हे 5 वर्ष 12 दिवस दिवस मुख्यमंत्री होते.
देशाच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर सर्वात कमी काळ मुख्यमंत्री राहण्याचा योग कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना आला. 17 मे 208 ते 19 मे 2018 या फक्त दोन दिवसासाठी येडीयुराप्पा मुख्यमंत्री होते. 21 फेब्रुवारी 1998 ते २३ फेब्रुवारी 1998 या फक्त तीन दिवसासाठी जगदंबिका पाल मुख्यमंत्री होते. त्यानंतर तिसऱ्या स्थानी देवेंद्र फडणवीस हे 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 या काळात मुख्यमंत्री राहिले.
राज्यात तीन वेळा राष्ट्रपती राजवट
राज्यात आतापर्यंत तीन वेळा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. यात सर्वात काळ राष्ट्रपती राजवट ही 1980 साली 112 दिवसांसाठी लागू करण्यात आली होती. त्यानंतर 2014 साली 32 दिवसांसाठी तर 2019 साली 11 दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मुख्यमंत्रीही देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला आहे. अजित पवार यांनी काही कारणास्तव राजीनामा दिल्याने आमच्याजवळ बहुमत उरलेलं नाही, त्यामुळं मी राज्यपालांकडे राजीनामा देणार आहे. राज्यात भाजप चांगल्या विरोधी पक्षाचे काम करेल, असेही ते म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement