Share Market: शेअर बाजारात आजही तेजी, Sensex 390 अंकांनी तर Nifty 112 अंकांनी वधारला
Stock Market Updates: मेटल, कॅपिटल गुड्स, फार्मा आणि बँकिंग इंडेक्समध्ये आज वाढ झाल्याचं दिसून आलं.
मुंबई: शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात वाढ झाल्याचं दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (Closing Bell Share Market Updates) सेन्सेक्समध्ये (Sensex) आज 390 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ( Nifty) आज 112 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.64 टक्क्यांची वाढ होऊन तो 61,045 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.62 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,165 वर पोहोचला.
आज शेअर बाजार बंद होताना मेटल आणि कॅपिटल गुड्सच्या शेअर्समध्ये आज मोठी खरेदी झाल्याचं दिसून आलं. मेटल इंडेक्समध्ये आज 2.4 टक्के तर कॅपिटल गुड्स इंडेक्समध्ये 1.4 टक्क्यांची वाढ झाली. तसेच बँक आणि फार्मा इंडेक्समध्येही आज प्रत्येकी 0.5 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे सार्वजिनक बँकांच्या निफ्टीमध्ये आज 1.2 टक्क्यांची घट झाल्याचं दिसून आलं. बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये 2.4 टक्क्यांची वाढ झाली.
आज बाजार बंद होताना Hindalco Industries, Tata Steel, Larsen and Toubro, UPL, आणि HDFC कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर Tata Motors, HDFC Life, UltraTech Cement, Adani Enterprises, आणि BPCL कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घट झाली.
शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 60.31 अंकांच्या वाढीसह 60,716 वर उघडला. तर, NSE चा निफ्टी 21 अंकांच्या किंचित वाढ म्हणजेच 0.12 टक्क्यांनी 18,074 वर उघडला. त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगलीच वाढ झाली. त्यामुळे मंगळवार आणि आज, या दोन सत्रांमध्ये गुंतवणूकदारांनी चांगलाच फायदा कमावल्याचं दिसून आलं.
या शेअर्समध्ये वाढ झाली
- Hindalco- 3.08 टक्के
- Tata Steel- 2.60 टक्के
- Larsen- 2.41 टक्के
- UPL- 1.83 टक्के
- HDFC- 1.78 टक्के
या शेअर्समध्ये घट झाली
- Tata Motors- 1.66 टक्के
- HDFC Life- 1.38 टक्के
- UltraTechCement- 1.28 टक्के
- Adani Enterpris- 1.17 टक्के
- BPCL- 0.67 टक्के
ही बातमी वाचा: