एक्स्प्लोर

चिनी बनावटीचे फवारणी पंप वापरल्याने शेतकऱ्यांना विषबाधा?

कमी वेळेत जास्त फवारणी करता येते म्हणून चिनी बनावटीच्या पंपांची विक्री वाढली आहे. मात्र हे पंप शेतकऱ्यांच्या जिवावर उठल्याचं समोर आलं आहे.

यवतमाळ : कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन विदर्भात 20 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले. तर साडे पाचशेपेक्षा जास्त शेतकरी विषबाधा झाल्यामुळे उपचार घेत आहेत. याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर यामागे चिनी बनावटीचे फवारणी पंप असल्याचं समोर आलं आहे. प्रशासनाकडून विषबाधा प्रकरणाचा शोध घेतला जात आहे. देशी बनावटीचे फवारणी पंप किंवा बॅटरीवर चालणारे स्वयंचलित पंप यांसोबत आता चिनी बनावटीचे फवारणी पंपही सध्या बाजारात उपलब्ध आहेत. या पंपच्या सहाय्याने कमी वेळात जास्त एकराची फवारणी करता येते. त्यामुळे या पंपांना जास्त मागणी आहे. पेट्रोलवर चालणारा हा चिनी पंप मोठ्या प्रमाणात तुषार फेकतो. या पंपातून निघणारे तुषार हलके राहत असल्याने ते हवेत जास्त काळ राहतात. शेतकऱ्यांनी पुरेशी काळजी घेतलेली नसेल तर यातूनच विषबाधा होते, असा निष्कर्ष समोर आला आहे. अशीच फवारणी यवतमाळ जिल्ह्यातील राजूरवाडी येथील शेतमजूर नितीन सोयाम यांनी केली. त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने तीन दिवस त्यांचे डोळे उघडलेच नाही. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डोळे नीट होण्यासाठी पुढचा एक महिना काळजी घ्यावी लागणार आहे. चिनी पंप वापरल्यामुळे असं झाल्याचं सोयाम यांचं म्हणणं आहे. विषबाधा होण्यामागची कारणं काय? यवतमाळ जिल्ह्यातील 20 शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विषबाधा होऊन जीव गमवावा लागला. तर साडे पाचशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांना विषबाधा झाली. अतिविषारी जहाल कीटकनाशकांचा वापर,  परवाना नसलेली कीटकनाशकांची कृषी केंद्र चालकांकडून होणारी विक्री, शेतकरी आणि शेतमजूर यांच्याकडून योग्य दक्षता न घेता केली गेलेली फवारणी, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणीसाठी मार्गदर्शनाचा अभाव ही विषबाधा होण्यामागची प्रमुख कारणं असल्याचं समोर आलं आहे. चिनी बनावटीचा पंप बाजारात 3 हजार रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत मिळतो. पेट्रोलवर चालणारा हा पंप आहे. त्यामुळे कमी वेळात जास्त फवारणी होते. त्यामुळे अलीकडच्या काळात या पंपांचा वापर वाढला आहे. फवारणी करताना काय काळजी घ्याल? फवारणी करताना तोंडाला कापड लावलं तर श्वास घेता येत नाही. बूट घातले तर वजन घेऊन चालत येत नाही, त्यामुळे अशी काळजी घेतली नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उलटी, मळमळ, चक्कर येणे हा त्रास सुरू होतो. शेतकरी अनेकदा दिवसभर तापत्या उन्हात काम करतात. कीटकनाशकाचे डब्बे सुरक्षित ठिकाणी जमिनीत टाकून नष्ट करावेत, फवारणी करताना वाऱ्याची दिशा पाहावी, कीटकनाशक जमिनीवर आणि गवतावर सांडू देऊ नये, फवारणी केल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवावे, कोट, हातमोजे, टोपी, डोळ्यांसाठी गॉगल या साहित्याचा वापर करावा, फवारणी करताना कीटकनाशकाची मात्रा न घेता नेमून दिलेल्या मापानुसार कीटकनाशक फवारावे, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.. ही सर्व आकडेवारी सराकरी रुग्णालयांमधील आहे. खाजगी रुग्णालयांमध्येही हजारो शेतकरी उपचार घेत आहेत. त्यामुळे कृषी विभागाने जागरूकता मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. संबंधित बातम्या :

फवारणी करताना विषबाधा, मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत!

'फवारणी करताना विदर्भात 18 जणांचा मृत्यू, तर 546 शेतकरी व्हेंटिलेटरवर

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
Kajalkath Yamini Dalvi: एबीपी माझाच्या प्रतिनिधी यामिनी दळवींच्या 'काजळकाठ' कवितासंग्रहाचा मराठवाडा साहित्य परिषद पुरस्कारानं सन्मान
एबीपी माझाच्या प्रतिनिधी यामिनी दळवींच्या 'काजळकाठ' कवितासंग्रहाचा मराठवाडा साहित्य परिषद पुरस्कारानं सन्मान
Nashik Crime News: आधी प्राध्यापिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर महाराष्ट्राबाहेर ट्रिपला चल म्हणाला; महिलेने नकार देताच माजी विद्यार्थ्याने ब्लॅकमेल केलं अन्...; नेमकं काय घडलं?
आधी प्राध्यापिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर महाराष्ट्राबाहेर ट्रिपला चल म्हणाला; महिलेने नकार देताच माजी विद्यार्थ्याने ब्लॅकमेल केलं अन्...; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Nagpur News : ‘निर्मल उज्ज्वल’ पत संस्थेच्या ठेवीदारांचा संताप; ठेवींची रक्कम मिळत नसल्याने नागपुरातील मुख्य कार्यालयाबाहेर राडा; नेमकं प्रकरण काय?
‘निर्मल उज्ज्वल’ पत संस्थेच्या ठेवीदारांचा संताप; ठेवींची रक्कम मिळत नसल्याने नागपुरातील मुख्य कार्यालयाबाहेर राडा; नेमकं प्रकरण काय?
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
Embed widget