छत्रपती संभाजीनगर : अनेकदा तुम्हाला सहज मच्छर (Mosquito) चावून जातो, मात्र, तुम्हाला चावलेला मच्छर कोणता होता याबाबत आपल्याला कळणे कठीण आहे. पण, आता तुम्हाला चावलेला मच्छर नेमके कोणत्या प्रजातीचे आहेत याचा शोध घेतला जाणार आहे. ऐकून जरा वेगळं वाटले असेल, पण छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) एका तरुणीने याबाबत भन्नाट संशोधन केले आहे. मच्छरचा शोध घेणारे मॉड्यूल एका प्राध्यापिकेने विकसित केले असून, या संशोधनाचे पेटंट प्रकाशित झाले आहे. त्यामुळे या संशोधनाचे कन्फर्मेशन प्रक्रिया सुरू असून, ते झाल्यास हे एक मोठी क्रांती समजली जाणार आहे. डॉ. आयेशा सिद्दीकी (Dr. Ayesha Siddiqui) असे या संशोधक तरुणीचे नाव आहे.
जगभरात दरवर्षी मच्छरजन्य रोगांपासून 7 लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे मृत्यू होते. राज्यात देखील सध्या अनेक ठिकाणी डेंगू मच्छरमुळे बऱ्याच लोकांनी आपला जीव गमवला आहे. पण आपल्याला चावलेला मच्छर कोणत्या प्रजातीचा आहे, याबाबत माहिती मिळणे अवघड आहे. पण यावर डॉ. आयेशा सिद्दीकी यांनी केलेल्या संशोधनानंतर चावलेला मच्छर कोणता याचा शोध घेतला जाणार आहे. यासाठी एक संवेदक सापळा बनवण्यात आला आहे. या संवेदक सापळाच्या माध्यामतून 10 वेगवेगळ्या डासांच्या प्रजाती संगणक तंत्रज्ञानाच्या मदतीने ओळखल्या जाऊ शकतात. विशेष म्हणजे तयार करण्यात आलेला संवेदक सापळा डासांच्या प्रजाती ओळखण्यात सक्षम आहे. ज्यात कॅमेरा, मायक्रो लेन्सचा, सेन्सरच्या मदतीने डासांची प्रजाती ओळखली जाऊ शकते.
असा होणार उपयोग...
दरम्यान, 'लोकमत'ने दिलेल्या वृत्तानुसार, याबाबत संशोधक आयेशा सिद्दीकी यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, डासांच्या प्रजाती ओळखण्यासाठी तयार करण्यात आलेला मॉड्यूलचा उपयोग कीटकशास्त्रज्ञ, आरोग्य कर्मचारी, व्हेक्टर कंट्रोल एजन्सी यांच्या मदतीने केला जाणार आहे. या संशोधनाला पेटंट मिळण्यासाठीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला असून, त्यानुसार हे संशोधन पेटंट कार्यालयाने प्रकाशित केले आहे. आता फक्त कन्फर्मेशनची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे डॉ. आयेशा सिद्दीकी यांनी म्हटले आहे.
मोठा दिलासा मिळणार...
मच्छरजन्य रोगांपासून अनेकदा जीव जाण्याच्या घटना देखील समोर येतात. विशेष म्हणजे आजार झाल्यावर रक्ताची तपासणी करून कोणता आजार झाला याबाबत निकष काढले जाते. यात बऱ्याचदा मच्छरजन्य रोगांचे निदान होतात. पण आता तुम्हाला चावलेला मच्छर कोणता होता याची माहिती लगेच मिळणार असल्याने, होणाऱ्या रोगांबाबत डॉक्टरांना उपचार करता येणार आहे. त्यामुळे या नवीन संशोधनाचा मोठा फायद होणार असून, यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: