Sanjay Shirsat on Sanjay Raut : तुम्ही काय चित्रपट काढता? दलाल नं 1 हा चित्रपट तुमच्यासाठी मी काढणार आहे, असा खोचक टोला आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना लगावला. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. 


संजय शिरसाट म्हणाले की, गेल्या दोन दिवसापासून दिल्ली दौऱ्याच्या चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. दिल्लीला मुख्यमंत्री किंवा इतर नेते जायचे त्यावेळेस कडाडून टीका करणारे सर्वजण देवदर्शनासाठी दिल्लीला गेले होते. त्यांचे देव कोण आहेत हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. एक मात्र नक्की आहे की, ज्या संजय राऊतांनी नवस केला होता तो त्यांचा नवस आता पूर्ण झाला आहे. मातोश्रीचा असलेला दबदबा त्यांनी आता इतरांच्या चरणी कसा लीन होतो, हे संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे. 


मीच दलाल नं 1 चित्रपट तुमच्यासाठी काढणार


ठाण्यातील लोक आता सिनेमा काढतायत, आपणही 'नमक हराम 2' चित्रपट काढणार अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. यावर संजय शिरसाट म्हणाले की, तुम्ही काय चित्रपट काढता? दलाल नं 1 हा चित्रपट तुमच्यासाठी मी काढणार आहे, असा टोला त्यांनी लगावला. संजय राऊत यांनी दोन महिने थांबा असे म्हटले. तर त्या पुढे त्यांनी 0 लावावा. म्हणजे 20 वर्ष होईल, कार्यकर्ते दूर जाऊ नये म्हणून त्यांचे असे भाष्य आहेत. संजय राऊत मराठी राहिलेच नाही, त्यांची कधीच सुंता झालेली आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की, ज्यांना पक्ष डुबवायचा असेल त्यांनी संजय राऊत यांना पक्षात घेतले पाहिजे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.  


राज ठाकरे यांच्या अंगावर चाल का करता?


राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या टाकल्याने मनसेच्या जिव्हारी लागले होते. यानंतर ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्या. यामुळे ठाकरे सेना- मनसे यांच्यात वाद चिघळल्याचे चित्र आहे. यावरदेखील संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे.  राज ठाकरे यांच्या अंगावर चाल का करता? त्यांना त्यांचा पक्ष चालवू द्या, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. 


आणखी वाचा 


'पुढच्यावेळी तुम्ही सांगाल तिथे, तुम्ही सांगाल त्यावेळेस...'; अविनाश जाधव यांचं प्रत्युत्तर, मनसे-ठाकरे गट वाद चिघळणार