Raj Thackeray on Ajit Pawar : महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, राज्यांमध्ये संधी उपलब्ध असताना बाहेरच्या मुलांना संधी मिळतात. स्थानिकांना मिळत नाहीत. त्या योग्य वापरल्यास तर आरक्षणाची गरज राहणार नाही असा पुनरुच्चार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. दरम्यान, मराठवाड्यातील दौऱ्याला विरोध झाल्यानंतर तसेच सुपारी फेकण्याच्या घटनेनंतर राज ठाकरे यांनी आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना इशारा दिला आहे. जर माझं मोहोळ उठलं, तर तुम्हाला एकही सभा घेता येणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी पवार आणि उद्धव ठाकरे यांना दिला आहे. महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला.
अजित पवार कधीच जातीच्या राजकारणात पडले नाहीत
राज ठाकरे यांनी बोलताना अजित पवार (Raj Thackeray on Ajit Pawar) यांच्यासोबत कितीही मतभेद असले तरी ते कधीही जातीच्या राजकारणात पडले नाहीत असं सांगितले. राज ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यांवरून बोलताना जोरदार पण टीका केली. ते म्हणाले की सगळ्या पक्षांनी मराठा समाजाला पाठिंबा दिला असताना अजून त्याचा निर्णय का होत नाही? मोदी मागील दहा वर्षे बहुमताने सत्तेत होते, तर उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित का केला नाही? मोदी शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलो म्हणतात, मग पवारांनी मराठा आरक्षणासाठी शब्द का नाही टाकला? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
दरम्यान, जरांगे पाटील यांच्या पाठीमागून यांचं मतांसाठी राजकारण सुरू असल्याचा आरोप सुद्धा राज ठाकरे यांनी केला. ते म्हणाले की यांनी शांत राहावं नाहीतर माझी मुलं काही करतील हे कळणार सुद्धा नाही. त्यांच्याकडे प्रस्थापित असेले, तरी माझ्याकडे विस्थापित असल्याचा इशारा त्यांनी दिला. कपडे काढून आरशात बघावे लागेल असेही ते म्हणाले. परप्रांतीय मुद्द्यांवरून पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी तोफ डागली. राज्यातील 60 टक्के रिक्षाचालक परप्रांतीय आहेत. त्यांना राज्य सरकारच्या वतीने परवाना दिला जात आहे. मराठा राज्यातील बहुतांश शैक्षणिक संस्था या मराठा समाजातील नेत्यांच्या आहेत. मग पोरांना शिकून वंचित का राहावं लागत आहे? अशी विचारणा त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या