महंत रामगिरी महाराजांच्या वक्तव्याने वैजापूरमध्ये तणाव; आक्रमक जमावाने टायर जाळले, मोठा बंदोबस्त तैनात

वैजापूर तालुक्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. 16 ऑगस्ट रात्री बारा वाजल्यापासून ते 19 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे.  वैजापूर उपविभागीय अधिकाऱ्यांनी जमाबंदीचे आदेश काढले आहे.

Continues below advertisement

छत्रपती संभाजीनगर :  सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या पंचाळे गावात प्रवचना दरम्यान एका धर्माविषयी केलेल्या  वक्तव्याने छत्रपती संभाजी नगरच्या वैजापूर शहरात तणाव निर्माण झाला होता. वैजापूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अचानक रात्री आठच्या दरम्यान जमाव जमा झाला त्यांनी घोषणाबाजी करत टायरही जाळले. या प्रकरणात वैजापूर पोलिसांनी रामगिरी महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल केला त्यानंतर जमाव शांत झाला.दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नका चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नका असं आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना केले आहे. 

Continues below advertisement

 या सर्व पार्श्वभूमीवर  वैजापूर तालुक्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. 16 ऑगस्ट रात्री बारा वाजल्यापासून ते 19 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे.  वैजापूर उपविभागीय अधिकाऱ्यांनी जमाबंदीचे आदेश काढले आहे. आज वैजापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चाचा ही आयोजन करण्यात आलं आहे.  नागरिकांनी शांतता राखावी त्याचबरोबर अफवा पसरवणारे, प्रक्षोभक मेसेज फॉरवर्ड करु नये. तसेच गैरसमज करणारे मेसेज फॉरवर्ड करु नये, असे आवाहन  छत्रपती संभाजीनगरचे ग्रामीण  पोलीस अधीक्षक  विनयकुमार राठोड यांनी केले आहे. 

शहरात तणावपूर्व शांतता

वैजापूर शहरात 15 ऑगस्टला रात्री तणाव निर्माण झाला. विशिष्ट समाजाचा मोठा जमाव अचानक डॉ.आंबेडकर चौकात जमला आणि घोषणाबाजी सुरू केली. रात्री आठपासून जमावाने चौकात ठाण मांडले होते. या वेळी जमलेल्या जमावाने कारवाईची मागणी केली. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जमावाची समजूत काढत कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिल्याने तणाव निवळला. सध्या  शहरात तणावपूर्व शांतता आहे.

नाशिकच्या येवला व मनमाडमध्ये पडसाद

प्रेषित महंमद पैगंबर यांचेविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गंगागिरी संस्थान गोदावरी धाम बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्यावर नाशिकच्या येवला शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महंत रामगिरी यांच्या प्रवचनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडीओमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा मुस्लिम समाजाने आरोप केला आहे..या विधानामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याने नाशिकच्या येवला व मनमाड शहरात काल मध्यरात्री त्याचे पडसाद उमटले होते मुस्लिम बांधवांनी येवला व मनमाड येथील पोलीस स्थानकातच ठिय्या मांडत महंत रामगिरी यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती,  अखेर महंत रामगिरी यांचेवर येवला शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महंत रामगिरी यांचा सिन्नर येथे नारळी सप्ताह सुरू असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज या सप्ताहाला भेट देण्यासाठी येत आहे.

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola