Mumbai airport : मुंबई विमानतळावर पार्किंगच्या वादातून तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. सुरक्षारक्षक आणि वाहन चालक यांच्यात जोरदार मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मुंबई विमानतळावर कुस्तीचा आखाडा सुरु झाल्यासारखीच वाहन चालक आणि सुरक्षा रक्षक यांच्यात तुफान हाणामारी सुरु होती.
पार्किंगच्या वादातून वाहन चालक आणि सुरक्षा रक्षक यांच्यात हाणामारी झाल्याचं माहिती मिळत आहे. पार्किंगवरुन सुरुवातीला बाचाबाची झाली त्यानंतर बाचाबाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले होते. हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दोन गटात झालेल्या हाणामारीच्या घटनेने विमानतळ परिसरात एकच गोंधळ उडाला होता. याप्रकरणी दोन्ही गटाविरोधात सहार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हाणामारी करणारे वाहन चालक आणि सुरक्षारक्षक यांना सहार पोलिसांनी अटक करुन पुढील तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
मुख्यध्यापिका अन् शिक्षिका यांच्यात तुंबळ हाणामारी; केस ओढले, कानफटात मारली, शाळेच्या आवारातच जुंपली, VIDEO