छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील  अत्यंत उच्चभ्रू वसाहत असलेल्या एन वन भागात 75 वर्षीय वृद्ध दाम्पत्याने  सोमवारी रात्री पावसात घराबाहेर अनोखे आंदोलन सुरू केले. या वृद्ध दाम्पत्याच्या (Old age Couple) मालकीचा एक जागा आहे. ही जागा त्यांनी एका दुकानदाराला भाड्याने दिली होता. मात्र, आता करार (live & licence agreement) संपल्यानंतरही संबंधित भाडेकरु (Rent) ही जागा खाली करण्यास नकार देत असल्यामुळे हतबल झालेल्या वृद्ध दाम्पत्यावर भरपावसात आणि विजांचा कडकडाट सुरु असताना रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची वेळ आली आहे. 


संबंधित भाडेकरुने करार संपल्यानंतर सहा महिन्यांचा वेळ वाढवून मागितला होता. वृद्ध दाम्पत्याने त्यानुसार दुकानदाराला सहा महिने वाढवून दिले. मात्र, त्यानंतरही आता हा दुकानदार वृद्ध दाम्पत्याच्या मालकीची जागा सोडायला तयार नाही. याबाबत जाब विचारल्यानंतर संबंधित दुकानदार तु्म्ही माझ्याविरोधात दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल करा, असे सांगतो. मात्र, आता मी 75 वर्षांचा आहे. या वयात मी न्यायालयात जाणार का? या खटल्याचा निकाल लागेपर्यंत माझा मृत्यू होईल. पोलीस मला न्याय का देऊ शकत नाही, असा सवाल वृ्द्ध व्यक्तीने विचारला. पोलिसांनी या वृ्द्ध दाम्पत्याची चौकशी करुन ते आंदोलन करत असलेल्या जागेचे फोटो काढून घेतले. मात्र, यानंतर पुढे पोलिसांकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. 


नेमकं काय घडलं?


भाडेकरारनामा संपल्यानंतर ही भाडेकरू  वृद्ध दाम्पत्याला  त्रास देणे सुरू करून जागा सोडण्यास नकार दिला आहे. पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे . 70 वर्षीय एलीझाबेथ बत्रा 76 वर्षीय पती सोबत एन-1 परिसरात राहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारी नुसार, 2020 मध्ये त्यांना एका व्यक्तीला घरासमोरील जागा किराणा, डेली निड्स व्यवसायासाठी भाडयाने दिली. सप्टेंबर, 2023 पर्यंत त्यांनी रीतसर   लिव्ह अँड लायसन्स करार केला. जून, २०२३ मध्ये त्यांनी सदर भाडेकरू ला जागा खाली करण्याची नोटीस दिली. मात्र, सप्टेंबर उलटल्यानंतर ही जागा सोडली नाही. याबाबत पोलिसांकडे त्यांनी वारंवार तक्रार केली.  न्यायालयात देखील धाव घेतली. मात्र, न्याय मिळत नसल्याने त्यांनी अखेर सोमवारी रात्री घराबाहेर झोपून आंदोलन सुरू केले.


आणखी वाचा


ठाणेदाराची दबंगगिरी! किरकोळ कारणावरून चक्क वृद्ध हॉटेल व्यावसायिकाला केली मारहाण


वृद्ध कलाकारांना मानधन,शासकीय-निमशासकीय जागांवर मोफत चित्रीकरण;राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय