Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. याबैठकीत शासकीय निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरणासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
 
सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले,"अबक वर्ग रद्द करून सर्व वृद्ध कलावंतांना पाच हजार रुपये मानधन देणार आहे. चित्रपटाला चालना देण्यासाठी कोणत्याही जागेत शूटिंग करता येईल. वन विंडे परवानग्या देण्यात येतील. एक भारत श्रेष्ठ भारत अन्वये बंगाली, तेलुगू, संस्कृती साहित्य उपबल्ध होईल".


काही दिवसांपूर्वी मराठी सिनेसृष्टीच्या उत्कर्षासाठी शासनाचा 'कलासेतू' हा कार्यक्रम पार पडला होता. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. 
परिसवांदाच्या माध्यमातून मराठी  चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी  काय करता येईल याचा परामर्श घेण्यात आला. ‘मराठी  चित्रपटसृष्टीसमोरील  नवी  आव्हाने'  या  पहिल्या परिसंवादात '1500 हुन अधिक  चित्रपट  तयार  होतात त्यांना प्रतिनिधित्व मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न  होणे अशा वेगवेगळ्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले.  


'शासकीय धोरण आणि वेबपोर्टल' या दुसऱ्या परिसंवादात ज्येष्ठ निर्माता -दिग्दर्शक महेश कोठारे, सिनेमॅटोग्राफर संजय जाधव, आशुतोष  पाटील, योगेश कुलकर्णी सहभागी  झाले होते.  मराठीला चित्रनगरीत  50 % सवलत  देणे,  SGST  बंद  करणे, करपती योजना चालू करणे , अनुदान बंद करणे, निर्माता होण्याकरिता नियमावली  तयार  करणे, आंतरराष्टीय चित्रपटासाठी पॅनल निर्माण करणे, निर्मात्यांसाठी व्यासपीठ निर्माण करणे ,सिंगल स्क्रीनचे कर माफ करणे आदि  मुद्द्यांचा उहापोह करण्यात आला.


मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय


- राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी


- तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार


- मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला


- 138 जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.  


- संस्कृत, तेलुगू, बंगाली, गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापणार


- शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण 


- विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल


- पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ.


- हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली ‘मॅनहोलकडून मशीनहोल’ कडे योजना


- संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार


- राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार


- ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ. ५० कोटी अनुदान


- भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप


- संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार


- वृद्ध साहित्यिक व कलाकारांना 5 हजार रुपये मानधन


- राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी 20 कोटी अतिरिक्त निधी मंजूर


- श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित


संबंधित बातम्या


Cabinet Meeting: मोठी बातमी : लोकसभा आचारसंहितेपूर्वी शिंदे सरकारचा धडाका, आठवड्यात तिसऱ्यांदा मंत्रिमंडळ बैठक, 72 तासात 62 निर्णय