छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र सराकरनं महिलांना आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. जुलै महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी केली जातेय. राज्य सरकारनं आतापर्यंत एक कोटी 59 लाख महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये दिले आहेत. या योजनेचा काही जण गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रकरणं उघडकीस येत आहेत. नवी मुंबईतील महिलांच्या आधार क्रमांकाचा वापर करुन एका व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण ताजं असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील असाच एक प्रकार समोर आला आहे.  कन्नड तालुक्यातील 12 भावांनी महिलांचे फोटो लावून स्वत: अर्ज भरल्याची बाब उघड झाली आहे.  या प्रकरणी कारवाईसाठी प्रस्ताव पाठव्यात आला आहे.  


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत भावांची घुसखोरी


मुख्यमंत्री माझी लाडकी  बहीण' योजनेचा लाभ मिळावा, यासाठी संभाजी नागरच्या कन्नड तालुक्यातील 12 भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरल्याची बाब महिला व बालकल्याण विभागाच्या निदर्शनास आली आहे.  याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे. कन्नड तालुक्यात 12 अर्ज असे आले होते, स्क्रुटिनीच्या वेळी ते अर्ज पुरुषांचे असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळं ते रिजेक्ट करण्यात आले आहेत. यात आधार कार्ड महिलांचं आणि नाव पुरुषाचं  होतं,अशी माहिती महिला  व बाल्य कल्याण विभागाच्या अधिकारी रेश्मा चिमंद्रे दिली.


'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ पात्र महिलांना देण्यासाठी राज्य शासनाने या योजनेला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. कन्नड तालुक्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत 92 हजार 98 अर्ज भरण्यात आले असून त्यातील 90 हजार 957 मंजूर करण्यात आले आहेत, तसेच तांत्रिक कारणाने 428 अर्ज अपात्र करण्यात आले आहेत, तर 357 रद्द केले आहेत.


दाखल करण्यात आलेल्या अर्जाच्या स्वीकृतीसाठी तालुक्याच्या ठिकाणी आलेल्या अर्जाची या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 30 ऑगस्ट रोजी पडताळणी केली असता हा प्रकार समोर आले. तालुक्यातील 12 जणांनी स्वतःच्या नावाने संबंधित पोर्टलवर अर्ज अपलोड केले. आधार कार्डही स्वतःच्याच नावाचा अपलोड केला, तसेच हमीपत्रही स्वतःच्याच नावाने भरून दिला. पोर्टलवर फोटो मात्र अन्य महिलांचे अपलोड केले. आता या प्रकरणात कारवाई होणार आहे. 


दरम्यान, अजित पवार यांनी काल एका ठिकाणी भाषण करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्यास कारवाईचा इशारा दिला होता. नवी मुंबईतील प्रकरणाचा दाखला देत ते म्हणाले होते की आम्ही देतो पण फसवणूक केली तर मग आम्ही तुरुंगात ही टाकतो. मग चक्की पिसिंग करा, असा इशारा अजित पवारांनी दिला होता.  


इतर बातम्या : 


Yojanadoot : शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करा अन् दरमहा 10 हजार मिळवा, योजनादूतसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी