Marathwada Dam Water Storage Update : जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली असून, जुलै महिन्यात देखील अपेक्षित पाऊस पडला नसल्याने मराठवाड्यातील (Marathwada) धरणातील पाणीसाठी (Dam Water Storage) आता कमी होत आहे. मराठवाड्यातील 11 प्रमुख धरणात आज घडीला 33.48 टक्के पाणीसाठा (Water Storage) शिल्लक राहिला आहे. तर मराठवाड्याची तहान भागावणाऱ्या जायकवाडी धरणात 26.93 टक्केच पाणीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील (Jayakwadi Dam) पाणीसाठी आता पिण्यासाठी आरक्षीत करण्याचा निर्णय छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे जायकवाडी धरण 33 टक्के भरपर्यंत जायकवाडी धरणातून पाणी सोडले जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


मराठवाड्यात यंदा जून महिन्यात पावसाने जवळपास पूर्णपणे पाठ फिरवली. त्यामुळे पेरण्या रखडल्या. तर विभागातील छोट्या-मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा देखील आता कमी होतांना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी छोटे प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. तर विभागातील प्रमुख 11 धरणात सध्या 33.48 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी आजच्या दिवशी हाच पाणीसाठी 44.06 टक्के एवढा होता. जर अशीच परिस्थिती राहिल्यास मराठवाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून देखील या दृष्टीने पाऊलं उचलली जात आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी जायकवाडी धरणातील पाणीसाठी आता पिण्यासाठी राखीव करण्याचा निर्णय घेतला आहे. धरणातील पाणीसाठा 33 टक्के होईपर्यंत आता धरणातून खाली पाणी न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


शेतकऱ्यांची चिंता वाढली...


गेल्यावर्षी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसानशेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले होते. मात्र यंदा जून महिना कोरडा गेला आहे. त्यात जुलै महिन्यात देखील अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या झालेल्या नाही. मराठवाड्यात सध्या 20 टक्केच पेरण्या झाल्या आहेत. तसेच अशीच परिस्थिती राहिल्यास ज्यांनी पेरण्या केल्या आहेत त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट उभं राहण्याची शक्यता आहे. 


मराठवाड्यातील धरणांचा पाणीसाठा...


जायकवाडी
उपयुक्त पाणी साठा: 20.64  टीएमसी 
टक्केवारी: 26.93



  • निम्न दुधना
    उपयुक्त पाणी साठा: 2.19 टीएमसी 
    टक्केवारी: 25.65

  • येलदरी
    उपयुक्त पाणी साठा: 15.86 टीएमसी 
    टक्केवारी: 55.53 टक्के

  • सिध्देश्वर
    उपयुक्त पाणी साठा: 00 टीएमसी 
    टक्केवारी: 00  टक्के

  • माजलगाव 
    उपयुक्त पाणी साठा: 1.77 टीएमसी 
    टक्केवारी: 16.03 टक्के

  • मांजरा 
    उपयुक्त पाणी साठा: 1.47 टीएमसी 
    टक्केवारी: 23.48 टक्के

  • पेनगंगा 
    उपयुक्त पाणी साठा: 14.57 टीएमसी 
    टक्केवारी: 42.79 टक्के

  • मानार
    उपयुक्त पाणी साठा:1.56 टीएमसी 
    टक्केवारी: 31.90 टक्के

  • निम्न तेरणा
    उपयुक्त पाणी साठा: 0.92 टीएमसी 
    टक्केवारी: 28.47 टक्के

  • विष्णुपूरी
    उपयुक्त पाणी साठा:1.14 टीएमसी 
    टक्केवारी: 39.87 टक्के

  • सिना कोळेगांव
    उपयुक्त पाणी साठा: -0.21 टीएमसी 
    टक्केवारी: -9.68 टक्के 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Marathwada Sowing : मराठवाड्यात खरीपाची सरासरी 20 टक्केच पेरणी, शेतकऱ्यांचा कल कपाशीकडे