एक्स्प्लोर

Maratha Reservation : मराठवाड्यात मराठा आरक्षणाबाबतचे 105.66 टक्के सर्वेक्षण पूर्ण; तब्बल 43 लाख 25 हजार 230 घरांचे सर्वेक्षण

Marathwada : मराठवाड्यात आठही जिल्ह्यात 105.66 टक्के सर्वे करण्यात आला आहे. ज्यात एकूण 43 लाख 25 हजार 230 घरांमधील 20467594  लोकांचे सर्वेक्षण झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण दूर करण्‍यासाठी मराठवाड्यातील (Marathwada) वेगवेगळ्या जिल्ह्यात 23 जानेवारीपासून सर्वेक्षणाला सुरवात झाली होती. राज्‍य मागासवर्ग आयोगाने (State Backward Classes Commission) निश्चित केलेल्‍या निकषानुसार सर्वेक्षण करण्यात आले असून, मराठवाड्यात आठही जिल्ह्यात 105.66 टक्के सर्वे करण्यात आला आहे. ज्यात एकूण 43 लाख 25 हजार 230 घरांमधील 20467594 लोकांचे सर्वेक्षण झाले आहेत. ज्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक 119 टक्के सर्वेक्षण करण्यात आले आहेत. 

मराठवाड्यातील सर्वेक्षण आकडेवारी...

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण 565821 घरातील 2621093 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्याची 107.94 टक्केवारी आहे.
  • छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीत एकूण 228199 घरातील 1228032 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहेत. ज्याची 92.91टक्केवारी आहे.
  • जालना जिल्ह्यात एकूण 390028 घरातील 1840447 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहेत. ज्याची 105.96 टक्केवारी आहे.
  • जालना महानगरपालिका हद्दीत एकूण 60991 घरातील 310000 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहेत. ज्याची 98.37 टक्केवारी आहे.
  • परभणी जिल्ह्यात एकूण 350138 घरातील 1606802 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहेत. ज्याची 108.95 टक्केवारी आहे.
  • परभणी महानगरपालिका हद्दीत एकूण 6805 घरातील 337885 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्याची 100.66 टक्केवारी आहे.
  • हिंगोली जिल्ह्यात एकूण 285879  घरातील 1258067 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहेत.  ज्याची 113.62 टक्के टक्केवारी आहे.
  • नांदेड जिल्ह्यात एकूण 615719 घरातील 3053961 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्याची 100.81 टक्केवारी आहे.
  • नांदेड महानगरपालिका हद्दीत एकूण 118593 घरातील 550439 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्याची 107.73  टक्केवारी आहे.
  • बीड जिल्ह्यात एकूण 593534 घरातील 2961345 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहेत. ज्याची 100.21 टक्केवारी आहे.
  • लातूर एकूण 560509 घरातील 2591170 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहेत. ज्याची 108.12 टक्केवारी आहे.
  • लातूर महानगरपालिका हद्दीत एकूण 90403 घरातील 449780 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहेत. ज्यांची 100.50 टक्केवारी आहे.
  • धाराशिव जिल्ह्यात 397391 घरातील 1657576 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहेत. ज्याची 119.87टक्केवारी आहे. 

राज्यभरात सर्वेक्षण...

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मागासवर्ग आयोगाच्या वतीने मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. राज्यभरातील सर्वच जिल्ह्यात हे सर्वे करण्यात येत आहे. तर, या सर्वेक्षणादरम्यान शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यातील 2 कोटी 72 लाख 57 हजार 735  घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले होते. 

एकत्रित अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाला दिला जाणार...

राज्यभरात करण्यात आलेल्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणातून संकलित करण्यात आलेली महितीवरून गोखले इन्स्टिट्यूटकडून प्रक्रियेचे काम केले जाणार आहे. त्यात माहितीची वर्गवारी आणि फिल्टर करून दुरुस्ती करण्याचे काम केले जाणार आहे. त्यानंतर तालुकानिहाय मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे अहवाल तयार केले जाणार आहेत. तालुक्यांचे अहवाल एकत्र करून जिल्हा व जिल्ह्यांचे अहवाल एकत्र करून विभागांचे अहवाल तयार करण्यात येणार आहेत. तसेच, हा एकत्रित अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाला येत्या आठवडाभरात सादर केला जाणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Chandrapur News: सर्वेक्षणाच्या कामात निष्काळजीपणा मनपा कर्मचाऱ्याला भोवला; आयुक्तांनी केली निलंबनाची कारवाई

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
Embed widget