Cotton News: राज्यभरातील कापूस (Cotton) उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून, भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी (Farmers) गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून घरात कापूस साठवून ठेवला आहे. मात्र आता हा साठवून ठेवेलेला आहे. मात्र साठवून ठेवलेला कापूस आता शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबासाठी त्रासदायक ठरु लागला आहे. साठवलेल्या कापसात पिसवा वाढू लागल्याने, त्वचा विकार होऊ लागले आहेत. त्यासाठी काही शेतकऱ्यांना कापसावर फवारणी करावी लागत आहे. विशेष म्हणजे घरात फवारणी करताना त्याचा वेगळा धोका निर्माण होत आहे. 


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे 4 लाख हेक्टरवर कापसाचे पीक घेण्यात आले होते. यातून सुमारे 20 लाख क्विटल कापसाचे उत्पादन झाल्याचा अंदाज कृषी अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. दरम्यान सुरुवातीला कापूस बाजारात विक्रीसाठी आल्यावर व्यापाऱ्यांनी दहा ते अकरा हजार रुपये प्रति क्विटलने भावाने कापूस विकत घेतला. मात्र त्यानंतर कापसाचे भाव सतत गडगडले. सध्या सहा ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून घरात कापूस साठवून ठेवला आहे. 


त्वचाविकार वाढले


मात्र साठवून ठेवलेला हाच कापूस आता धोकादायक ठरु लागला आहे. या कापसात पिसवा झाल्याने त्वचा विकारांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. अंगावर पुरळ येणे, गाठी होणे, खाज येणे असे त्वचाविकार होत आहेत. यापासून सुटका व्हावी, यासाठी काही शेतकऱ्यांनी कापसाच्या साठ्यावर कीटकनाशक फवारणी सुरु केली आहे. पण अनेकदा घरात लहान बाळ आणि वृद्ध आजारी व्यक्ती असल्याने त्यांच्यासाठी फवारणी धोकादायक ठरण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 


अधिवेशनात पडसाद! 


दरम्यान कापूस आणि कांद्याचे भाव पडल्याने याचे पडसाद आता अधिवेशनात उमटताना पाहायला मिळत आहे. तर यावरुनच विरोधकांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर विधीमंडळाच्या पायऱ्यावर विरोधी पक्षातील आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर गळ्यात कांदे आणि कापसाच्या बोंडाची माळ घालून विरोधकांनी सरकारचा निषेध केला आहे. तर यावरुन अधिवेशनात चर्चा देखील सुरु असून, विरोधकांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देत आहे. मात्र मुख्यमंत्री बोलत असतानाच विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सभागृहात सध्या गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर कांद्याची खरेदी नाफेडने सुरु केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Mumbai NCP Protest : गळ्यात कांद्याच्या आणि कापसाच्या माळा, विधानभवनात राष्ट्रवादीच्या आमदारांकडून आंदोलन