Maharashtra Cabinet : शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात समाधानकारक काम न करणाऱ्या शिंदे गटाच्या (Shinde Group) पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे आदेश भाजपच्या हायकमांडकडून देण्यात आल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाली होती.  तसेच या पाचही मंत्र्यांच्या जागी नवीन लोकांना संधी देण्याचे देखील दिल्लीतून आदेश असल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे या मंत्र्यांमध्ये मराठवाड्यातील तिघांचा समावेश होता. तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप करतांना या तीनही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र खातेवाटपात 'त्या' पाचपैकी मराठवाड्यातील तीन मंत्र्यांना 'जीवदान' मिळाले असून, दोघांचे मंत्रीपद कायम आहे. तर एकाचा महत्वाचे खाते काढून घेण्यात आले आहेत. 


शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre), तत्कालीन कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar), आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant), पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulab Patil), तत्कालीन अन्न वं औषध प्रशासन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) या शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे आदेश भाजपच्या हायकमांडकडून देण्यात आल्याची चर्चा होती. मात्र ज्यात संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत हे तीनही मराठवाड्यातील मंत्री होते. दरम्यान काल झालेल्या खातेवाटपात या तीनही मंत्र्यांना 'जीवनदान' मिळाले असून, कोणाचेही मंत्रीपद काढून घेण्यात आलेले नाहीत. पण याचवेळी अब्दुल सत्तार यांचे कृषिमंत्री काढून त्यांना जोरदार धक्का दिला आहे.


कारवाईची टांगती तलवार कायम? 


राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर या सरकारमधील सर्व मंत्र्यांच्या कामगिरीवर नजर ठेवण्यासाठी भाजपची स्वतंत्र यंत्रणा काम करत आहे. सोबतच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत या सर्व मंत्र्यांचा कितपत उपयोग होईल याचा अभ्यास केला जात आहे. ज्यात शिंदे गटातील पाच 5 मंत्री ब्लॅकलिस्टमध्ये आले असून, त्याचा अहवाल भाजप हायकमांडला देण्यात आला होता. त्यामुळे या पाचही मंत्र्यांना 'डच्चू' देण्याची भूमिका दिल्लीतून स्पष्ट करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र सध्यातरी या पाचही मंत्र्यांवरील कारवाई टळली आहे. मात्र त्यांच्या कामावर दिल्लीतील मंडळी नाखूष असल्याने कारवाईची टांगती तलवार कायम असल्याचे बोलले जात आहे. 


अब्दुल सत्तारांना धक्का....


अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या एकूण 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र सत्तेत असलेल्या शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षात खातेवाटपावरून गोंधळ पाहायला मिळाला. दरम्यान तब्बल 13 दिवसांनी खातेवाटप करण्यात आला आहे. मात्र याचवेळी सत्तार यांना मोठा धक्का बसला आहे. कारण सत्तार यांचे कृषी खातं काढून घेण्यात आले असून ते राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांना देण्यात आले आहेत. तर सत्तार यांच्याकडे अल्पसंख्याक विकास आणि औकाफ, पणन खात्याचा कार्यभार असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra Cabinet: शिंदेसेनेच्या 'त्या' पाच मंत्र्यांना हटवा, भाजप हायकमांडचे आदेश; मराठवाड्यातील तिघांचा समावेश