Aurangabad News : नागपूर येथील सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यभरात 'होऊ द्या चर्चा' कार्यक्रम आयोजित करून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा भांडाफोड करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले होते. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार आता हा उपक्रम राबिवला जात असून, याची सुरवात औरंगाबादमधून होत आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नेतृत्वाखाली उद्या औरंगाबादच्या हर्सूल टी पॉइंट येथे 'होऊ द्या चर्चा' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 


औरंगाबादच्या हर्सूल टी पॉइंट येथे शुक्रवारी (14 जुलै) रोजी अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली 'होऊ द्या चर्चा'चे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी म्हणून सुरू केलेल्या विकास योजनांची सद्यपरिस्थिती काय आहेत? याची माहिती यावेळी दिली जाणार आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही संकल्पना राबविण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे सुद्धा उपस्थित असणार आहेत. 


केंद्र आणि राज्य सरकारने सुरू केलेली आयुष्यमान भारत योजना, हर घर जल योजना, किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री उज्वला योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, जल शिवार योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना व सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी सुरू केलेली आपला दवाखाना योजना अशा सर्व शासकीय योजनांचा भांडाफोड यावेळी केला जाणार असल्याचे अंबादास दानवे म्हणाले आहेत. सायंकाळी 4 वाजता हा कार्यक्रम होणार असून या विविध योजनांसाठी शासन स्तरावरून करण्यात आलेल्या खर्चाची तरतूद तसेच प्रत्यक्षात त्यासाठी वितरित केलेला निधी आणि नागरिकांना मिळालेला लाभ यांची वास्तव आकडेवारी सहित मांडणी केली जाणार आहेत. स्वतः अंबादास दानवे या योजनांची माहिती नागरिकांना सांगणार आहे. 


वास्तव परिस्थिती वेगळी आहे...


मागील वर्षांपासून मोठ्या प्रमाणात केंद्र व राज्य सरकार अनेक ठिकाणी जाहिरात देऊन करोडो गरीब व सर्वसामान्य नागरिकांना आम्ही विविध शासकीय योजनांचा लाभ दिलेला आहेत, असा दावा करत आहेत. परंतु वास्तव परिस्थिती यापेक्षा वेगळी असल्याची आकडेवारी समोर आलेली आहेत. प्रत्यक्षात या योजना पासून सर्व लाभार्थी वंचित असून गरजू नागरिकांना त्यांचा लाभ मिळालाच नाहीत. याच फसव्या योजनांचा भांडाफोड करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे अंबादास दानवे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra Political Crisis : अर्थ खात्यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये मार्ग निघेना, आता विरोधी पक्षनेते दानवेंनीच सुचवला पर्याय