Beed Crime News: अवघ्या आठ वर्षांच्या मुलीवर एका 40 वर्षाच्या नराधमाने अत्याचार (Rape) केल्याची संतापजनक घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. पीडित चिमुरडीला आरोपीने पाच रुपयांच्या पेप्सीचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. बीड शहरातील (Beed City) पेठबीड भागात गुरुवारी दुपारी ही संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान मुलीचा शोध घेत असताना नराधम आरोपीच्या घराबाहेर चिमुकलीची चप्पल दिसून आल्यावर नागरिकांना संशय आला. त्यामुळे अखेर परिसरातील रहिवाश्यांनी आरोपीचे पत्रे काढून घरात प्रवेश केला आणि दुष्कृत्य करताना त्याला रंगेहात पकडला. याप्रकरणी पेठबीड पोलिस ठाण्यात पोक्सोसह इतर कलमांन्वये नराधमाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
गुरुवारी दुपारी बीड शहरातील पेठबीड भागात राहणारी एक आठ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. मुलगी तीन तास मुलगी बेपत्ता राहिल्याने आईसह परिसरातील नागरिकांनी तिचा शोध सुरु केला. दरम्यान परिसरातील एका व्यक्तीच्या घराबाहेर मुलीची चप्पल दिसून आली. घराचा दार बंद असल्याने नागरिकांना संशय आला. त्यामुळे नागरिकांनी घराचे पत्रे काढून घरात प्रवेश केला. नागरिकांनी घरात प्रवेश करताच त्यांना यावेळी हा नराधम दुष्कृत्य करताना दिसला. त्यामुळे त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पेप्सीचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार
पीडित मुलगी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घराजवळच खेळण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. याचवेळी गल्लीतीलच एका 40 वर्षाच्या नराधमाची तिच्यावर नजर पडली. तर या नराधमाने मुलीला जवळ बोलावून तिच्या हातात पाच रुपये देत तेथीलच एका दुकानातून पेप्सी आणण्यास सांगितले. मुलगी पेप्सी घेऊन आल्यावर तिला आपल्यासोबत घरात नेले. घरात नेल्यावर अल्पवयीन मुलीवर त्याने अत्याचार केला. पण नागरिकांनी घराचे पत्रे काढून, त्याला रंगेहात पकडून चोप दिला. तसेच याबाबत पोलिसांना माहिती देऊन, त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर या प्रकरणी पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीची चप्पल नराधमाच्या घराबाहेर दिसून आली
आरोपीने मुलीला पेप्सीचे आमिष दाखवून घरात नेले. तर इकडे मुलीची आई तिचा सर्वत्र शोध घेत होती. सर्व सर्व परिसर शोधल्यावर देखील मुलगी कोठेही न दिसल्याने महिलेला रडू कोसळले. मात्र याचवेळी मुलीच्या आईला मुलीची चप्पल नराधमाच्या घराबाहेर दिसून आली. त्यामुळे त्याच्या घराचा दरवाजा वाजवला, मात्र आतून कोणीही प्रतिसाद दिला नाही. घाबरून गेलेल्या मुलीच्या आईने आरडाओरडा केला आणि त्यामुळे गल्लीतील लोक जमा झाले. महिलेने घडलेला प्रकार सांगताच परिसरातील नागरिकांनी नराधमाच्या घराचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला असता हा नराधम नग्नावस्थेत आढळला. तर पीडित मुलगीही घाबरलेल्या अवस्थेत रडत होती. तर नागरिकांनी नराधमाला चोप दिल्याने, तो जखमी झाला आहे. त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
बीडमधील पद्मश्री विजेत्या गोरक्षकाची फरफट; ना चारा, ना पाणी, गायींचा सांभाळ करायचा कसा?