Suicide News: छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) एक धक्कादायक घटना समोर आली असून, तरुणीसोबत असलेले प्रेमप्रकरण आई-वडिलांना माहिती पडल्याने तणावात आलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. ही घटना बुधवारी रात्री राजणगाव परिसरातील शिक्षकनगर येथे उघडकीस आली आहे. रितेश सुखदेव गायकवाड (वय 19 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 


याबाबत पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, रितेश गायकवाड हा एका कंपनीत काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याची एका तरुणीसोबत मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेम अधिक वाढलं. याच काळात त्यांनी दोघांनी एकत्र फोटो काढले होते. मात्र मोबाईल मधील फोटो त्याच्या आई-वडिलांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी रितेशला फोटोबाबत विचारणा केल्याने प्रचंड घाबरला होता. तसेच पालकांनी त्याला समज दिल्याने तो तणावात आला होता. 


फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला.


आई-वडिलांना आपलं प्रेमप्रकरण माहित झाले आणि त्यांनी प्रेमिकेसोबतचे फोटो देखील बघितल्याने रितेश तणावात होता. त्याने घडलेला प्रकार मोबाईल वर मित्रांसोबत चॅट केला. त्यानंतर याच तणावातून त्यानी काल सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घरातील छताच्या सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला. रात्री त्याचे आई वडील कामावरून परत आल्यावर का प्रकार उघडकीस आला. 


आई-वडिलांना धक्काच बसला...


बुधवारी सायंकाळी रितेशचे आई-वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. रात्री ते घरी आल्यावर त्यांनी रितेशला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून त्यांना धक्काच बसला. त्यानी आरडाओरड केल्याने शेजारी धावून आले.  त्यानंतर पोलिसाना माहिती देऊन रितेशला बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. रितेश हा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकारणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार रामचंद्र बिघोत हे तपास करीत आहेत.


अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या...


दुसऱ्या एका घटनेत, मित्रांसोबत जेवण केल्यावर कॉलेजकडे जाऊन येतो म्हणून गेलेल्या एमआयटी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. गुरुवारी (16 फेब्रुवारी) रोजी पहाटे पावणेदोन वाजेच्या सुमारास संग्रामनगर उड्डाणपूल परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिल सुरेश जाधव (वय 22 वर्षे, रा. वाल्सा खाल्सा, ता. भोकरदन, जि. जालना) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


धक्कादायक! कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमी चिमुकल्याचा मृत्यू; 22 दिवसांची झुंज अपयशी