Harshawardhan jadhav:महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीने विजयाची कमान गाठली. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड मतदारसंघात हर्षवर्धन जाधव यांचा झालेला दारुण पराभव जिव्हारी लागल्याने कन्नडमधील दोन तरुणांनी विष पित आत्महत्येचा प्रयत्न केलाय.कन्नड तालुक्यातील जामडी घाट येथे ही घटना घडली.  हर्षवर्धन जाधव यांचा पराभव जिव्हारी लागल्याने या दोन तरुणांनी विषारी द्रव्य पित आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.सुनील रामदास शिरसाठ आणि आनंद वसंत जाधव यांनी घेतले विष घेतलेल्या तरुणांची नाव आहेत. एकावर कन्नड येथेच उपचार सुरू आहेत तर दुसऱ्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आले आहे.


दादा पडायला नाही पाहिजे होता म्हणत घेतले विष


कन्नड विधानसभा मतदारसंघात अपक्ष उभारलेले हर्षवर्धन जाधव यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यांच्याविरोधात  शिवसेना ठाकरे गटाचे उदयसिंह राजपूत आणि शिवसेना शिंदे गटाच्या संजना जाधव उमेदवार होत्या. विधानसभेच्या रिंगणात हर्षवर्धन जाधव यांचा पराभव जिव्हारी लागल्याने दोन तरुणांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. दादा पडायला नाही पाहिजे होता, आता आम्ही काय करु म्हणत त्यांनी हा जीवघेणा मार्ग पत्करल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलं. कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात  या दोघांना उपचारांसाठी हलवण्यात आल्याचंही ते म्हणाले. 


पिच्चर बहोत सारा बाकी है


हर्षवर्धन जाधव यांच्या पराभवामुळे दोन तरुणांनी विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं सांगताना हर्षवर्धन जाधव यांनी हात जोडून असं कोणतंही पाऊल न उचलण्याची विनंती केली. यावेळी त्यांनी पिच्चर अभी बहोत बाकी है असं म्हणत तरुणांना सगळं संपलय, असं समजू नका असं सांगितलं. अजून सुरुवात पण झाली नाही. मला स्वत:ला विकावं लागलं तरी विकेन पण तुमच्या आशा आकांक्षांना  वाया जाऊ देणार नसल्याचा शब्द हर्षवर्धन जाधव यांनी दिला.


मतदारसंघात आपणच आहोत, असं करू करा


आत्महत्येचा प्रयत्न, विष पिणे असं सगळं करू नका. मतदारसंघात आपणच राजे आहोत.मला विकावं लागलं तरी चालेल पण तुम्हाला ईजा होऊ देणार नाही असं म्हणत हर्षवर्धन जाधव यांनी हात जोडून तरुणांना विनंती केल्याचं दिसलं.