छत्रपती संभाजीनगर : वंदे भारत एक्स्प्रेसच्या (Vande Bharat Express) उद्घाटनाच्या पत्रिकेत नाव नसल्याने खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) चांगलेच संतापले होते. माझी काही अॅलर्जी त्यांना आहे का? असा सवाल त्यांनी केला होता. तसेच, उद्घाटनापूर्वी दणका दाखवतो असा इशाराही जलील यांनी दिला होता. दरम्यान, इम्तियाज जलील यांच्या इशाऱ्यानंतर उद्घाटनाच्या पत्रिकेत रेल्वे विभागाने इम्तियाज यांचे नाव टाकले आहे. यासाठी रात्री उशिरा पुन्हा एकदा दुसरी पत्रिका तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांचे देखील नाव नव्हते, मात्र आता त्यांचे नाव देखील पत्रिकेत टाकण्यात आले आहे. 

Continues below advertisement


वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनाच्या पत्रिकेत नाव नसल्याने खासदार इम्तियाज जलील आक्रमक झाले होते. याचवेळी, छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकामध्ये येऊन एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती. वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटन कार्यक्रमात जलील यांचं नाव नसल्यानं हे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर आता रेल्वे विभागाने जलील यांचे नाव असलेली नवीन पत्रिका तयार केली आहे. सोबतच यापूर्वीच्या पत्रिकेत नाव नसलेल्या इतर स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे देखील नाव टाकण्यात आले आहेत. 


मुंबई-जालना धावणार वंदे भारत एक्स्प्रेस 


महाराष्ट्रातील सातवी आणि मराठवाड्याला मुंबईला जोडणारी पाचवी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस शनिवारपासून जालना-मुंबई मार्गावर धावणार आहे. या हायस्पीड ट्रेनचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं अयोध्येमधून होणार आहे. नव्या वर्षात ही गाडी एक जानेवारीपासून गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेत दाखल होईल. मुंबई-जालना ही वंदे भारत एक्स्प्रेस आठवडय़ातून सहा दिवस धावणार आहे. ही ट्रेन जालना रेल्वे स्थानकातून पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी सुटेल आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुपारी बारा वाजता पोहोचेल. ही ट्रेन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दुपारी एक वाजून 10 मिनिटांनी सुटेल आणि जालन्यात रात्री साडेआठ वाजता पोहोचणार आहे. या ट्रेनला छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक आणि ठाणे असे चार थांबे आहेत.


जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक (वन-वे)


30 डिसेंबर 2023 रोजी 8 डब्ब्यांची वंदे भारत विशेष ट्रेन 02705 जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस (वन-वे) जालन्याहून सकाळी 11 वाजता रवाना होईल. जालन्याहून रवाना झालेली ही गाडी सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी औरंगाबादला पोहोचणार असून 11 वाजून 57 मिनिटांनी प्रस्थान करेल. त्यानंतर ट्रेन मनमाड जंक्शनवर 13:42 hrs/13:44 hrs, नाशिकरोड - 14:44 hrs/14:46 hrs, कल्याण जंक्शन - 17:06 hrs/17:08 hrs, ठाणे - 17:28 hrs/17 :30 तास, दादर - 17:50 तास/17:52 तास, सीएसएमटी मुंबई - 18:45 तास पोहोचेल पोहोचेल.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Jalna-Mumbai Vande Bharat Train: जालना-मुंबई वंदे भारत रेल्वे, महाराष्ट्रातील सातवी अन् मुंबईला जोडणारी पाचवी वंदे भारत; मोदींच्या हस्ते आज उद्घाटन