Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) एक दुर्दैवी घटना समोर आली असून, शॉक लागून तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. बोर्ड लावण्यासाठी बिल्डिंगवर चढला असताना त्याला तारेचा शॉक लागला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. शहरातील गारखेडा परिसरात ही घटना घडली आहे. दरम्यान या प्रकरणी मयत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय विष्णू चांदणे (रा. म्हाडा कॉलनी देवळाई परिसर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर आशिष नवगिरे व संजय आरसूळ असे आरोपींचे नावं आहेत. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कॉल सेंटरचा बोर्ड लावण्यासाठी बिल्डिंगवर चढलेल्या तरुणाला हाय व्होल्टेज तारेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. गारखेडा परिसरातील हनुमान नगर चौकात ही घटना घडली. या प्रकरणी कॉल सेंटरचा ठेकेदार व अन्य एकावर पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष नवगिरे व जीजस कॉल सेंटरचे मालक संजय आरसूळ अशी आरोपींची नावे आहेत. तर मयत अक्षयचे वडील विष्णू सुदाम चांदणे यांनी फिर्याद दिली. 


चांदणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा अक्षय हा ठेकेदार आशिष नवगिरे यांच्याकडे काम करतो. 21 जून रोजी दुपारी एक वाजेचया सुमारास आशिष नवघरे यांनी ठेका घेतलेल्या हनुमान नगर चौक जवळील सेंटर मार्ट या बिल्डिंगवर जीसस कॉलचे बोर्ड लावण्यासाठी अक्षय चांदणे व सखाराम चांदणे हे चढले होते. बिल्डिंग वर हाय टेन्शन विद्युत पुरवठा तार अतिशय जवळ असूनही कुठल्याही प्रकारची काळजी न घेता सेफ्टी गार्ड न देता त्यांना बिल्डिंगवर पाठविले. दरम्यान यावेळी अक्षय याला हाय टेन्शन विद्युत तारेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. त्यामुळे याप्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड हे करीत आहेत.


वीज मीटरमध्ये फेरफार, हॉटेल चालकावर गुन्हा


हॉटेलच्या मीटरमध्ये फेरफार करून दहा महिन्यात तब्बल 7 हजार 394 युनिट ची चोरी केल्याप्रकरणी हॉटेल चालकावर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शकील जमील खान (रा. हॉटेल फूड पांडा कोर्ट, गट क्रमांक 406 जालना रोड चिकलठाणा) असे आरोपीचे नाव आहे. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रवीण भीमराव पाटील यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. ज्यात 11 ऑगस्ट 2022 रोजी महावितरणचे पथक तपासणी करीत असताना हॉटेल फूडपांडा कोर्ट येथे आरोपीने व्यावसायिक वीज मीटरमध्ये फेरफार करून तब्बल दहा महिने वीज वापर केला. या काळात 7 हजार 394 ची वीजचोरी झाल्याचे उघड झाले. महावितरणचे 1 लाख 19 हजार 298 रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी आरोपीवर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सातपुते हे करीत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhaji Nagar : पार्सल तर आले नाही, पण खात्यातून 90 हजार मात्र गेले; भामट्याची अशीही चालबाजी