Chhatrapati Sambhaji Nagar Corona Update: एकीकडे राज्यभरात मोठ्या आनंदात गुढीपाडवा (Gudi Padwa) साजरा केला जात असताना, दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरकरांची (Chhatrapati Sambhaji Nagar) कोरोनाने (Corona) चिंता वाढवली आहे. कारण कोरोना संसर्गाने शहरात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यात 17 नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले असतानाच, आता मंगळवारी (21 मार्च) रोजी एकाच दिवसात 15 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत शहरात कोरोनाचे 43 सक्रिय रुग्ण असून, सर्वजण घरीच उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे सर्व रूग्णापैकी कोणालाही गंभीर लक्षणे नाहीत. 


पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत शहरातील रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणावर पाहायला मिळाली होती. उपचारासाठी नागरिकांचे मोठे हाल झाले. अनेकांनी आपला जीव गमवला होता. एवढंच नाही तर दुसऱ्या लाटेत तर रुग्ण संख्या एवढी होती की, शहरातील सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयांतील खाटा रुग्णांच्या उपचारासाठी कमी पडल्या होत्या. हा सर्व अनुभव पाहता, कोरोना संसर्ग उन्हाळ्याच्या दिवसांत अधिक सक्रिय होऊन संसर्गजन्य ठरतो. दरम्यान आता मार्च महिना सुरु झाल्यावर अशीच काही रुग्ण संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत 15 नवीन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाची देखील चिंता वाढली आहे. तर मंगळवारी दर शंभर चाचण्यांमागे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट 9.55 टक्के असल्याचे अहवालात नमूद केले आहे.


आरोग्य विभागाची चिंता वाढली... 


पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता रुग्ण वाढल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाले आहे. तर एकाचवेळी 15 रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. त्यामुळे आता वाढती रुग्ण संख्या पाहता महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग आणि जिल्हा आरोग्य विभाग यांच्याकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहे. तसेच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. तसेच कोरोनाचे लक्षणे दिसल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घेण्याचे देखील आवाहन डॉक्टरांनी केले आहेत. तर शहरातील आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करण्यात येत आहे. 


गुढीपाडव्याच्या शोभयात्रेत सहभागी होताना काळजी घ्या...


आज राज्यभरात मोठ्या आनंदात गुढीपाडवा साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे शहरात यानिमित्ताने शोभयात्रा देखील काढण्यात येणार असून, मोठ्याप्रमाणावर नागरिक यात सहभागी होत असतात. पण वाढत्या कोरोनाची रुग्ण संख्या पाहता शोभयात्रेत सहभागी होताना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.  शोभयात्रेत होणारी गर्दी लक्षात घेता मास्कचा वापरा केला पाहिजे. तसेच घरी आल्यावर हात धुतले पाहिजे. तर गर्दीत वावरताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


Gudi Padwa 2023 : 'या' गावात गुढी सात दिवस डौलाने फडकवितात; बावीस वर्षांपासून परंपरा कायम