Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) अनुषंगाने महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. अशात इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar) देखील अशीच काही परिस्थिती आहे. तर, संभाजीनगर लोकसभेत शिवसेना (Shiv Sena) विरुद्ध शिवसेना अशी लढाई होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजपने (BJP) दावा केला असला तरीही महायुतीत संभाजीनगर लोकसभेची जागा महायुतीत शिवसेनेकडेच असणार असल्याचे बोलले जात आहे. तर, महाविकास आघाडीत देखील ठाकरे गटाचा उमेदवार असणार आहे. त्यामुळे मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा सामना रंगणार असल्याची चर्चा आहे. 


छत्रपती संभाजीनगरची लोकसभा जागा लढवण्यासाठी इच्छुकांनी यादी मोठी आहे. मात्र, यात काही प्रमुख नेत्यांची नावं सर्वाधिक चर्चेत आहेत. शिंदे गटाकडून विनोद पाटील, संदिपान भुमरे, राजेंद्र जंजाळ इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे, विधानपरिषदेचे विरोध पक्षनेते अंबादास दानवे इच्छुक आहेत. त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना झाल्यास वरीलपैकी कोणत्या नेत्यांना उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


विनोद पाटलांना डबल ऑफर?


लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलनाचा प्रभाव पाहता संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून मराठा उमेदवार देण्यावर सर्वच पक्षाचा भर असणार आहे. अशात मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी देखील लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विनोद पाटील यांना भाजपकडून आणि शिंड गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तशी चर्चा आहे. त्यामुळे महायुतीत कुणालाही संभाजीनगर जागा सुटल्यास लॉटरी विनोद पाटील यांचीच लागण्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे भाजपकडून भागवत कराड, अतुल सावे आणि शिंदे गटाकडून संदिपान भुमरे यांच्या नावाची देखील चर्चा आहे.


मराठा आंदोलन महत्वाची भूमिका? 


मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापला आहे. त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत देखील पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारी देतांना सर्वच पक्षाकडून याचा विचार केला जाणार आहे. संभाजीनगरमध्ये गेल्या निवडणुकीत देखील मराठा आंदोलनाचा प्रभाव पाहायला मिळाला आणि त्यामुळे चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता. यंदाही याची पुनरावृत्ती होऊ नयेत यासाठी उमेदवारी देतांना सर्वच पक्षाकडून जातीय समीकरणाचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


खाण की बाण, मराठा आरक्षण, नामांतरासह पाणी प्रश्नावरून गाजणार छत्रपती संभाजीनगरची लोकसभा निवडणूक; कुणाला कोणत्या पक्षातून मिळणार उमेदवारी?