एक्स्प्लोर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला गालबोट; सामूहिकरित्या पदवी वाटप केल्याने विद्यार्थी आक्रमक

Chhatrapati Sambhaji Nagar : शेवटी विद्यापीठ प्रशासनाने नरमाईची भूमिका घेऊन, विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी वाटप केल्याने वादावर पडदा पडला.

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज दीक्षांत समारंभ पार पडला. मात्र याच दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमाला गालबोट लागल्याचे पाहायला मिळाले. कारण सामूहिकरित्या पदवी वाटप केल्याने विद्यार्थी आक्रमक झाले. तर कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी वाटप करण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी हॉलमध्येच घोषणाबाजी करत गोंधळ घातला. शेवटी विद्यापीठ प्रशासनाने नरमाईची भूमिका घेऊन, विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी वाटप केल्याने वादावर पडदा पडला. मात्र या घटनेची विद्यापीठ परिसरात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. 

छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या दीक्षांत समारंभाला राज्यपाल येणार होते. मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला आणि त्यांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावली. दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांना पदविका वाटप करण्यात आल्या. मात्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी वाटप न करता सामूहिकरित्या पदव्या देण्यात आल्या. त्यामुळे प्रमुख पाहुण्यांच्याच हस्ते पदविका मिळाव्या असा विद्यार्थ्यांनी आग्रह धरला. पाहता-पाहता विद्यार्थ्यांचा संताप वाढला. तर संतत्प झालेल्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ सुरु केला.  अशा पद्धतीने जर डिग्री हातात द्यायच्या होत्या तर या ठिकाणी बोलावलं कशाला असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. घोषणाबाजी सुरु झाल्याने विद्यापीठ प्रशासनाने कार्यक्रम आटोपता घेतला. मात्र यामुळे विद्यार्थी आणखीनच आक्रमक झाले. 

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी वाटप करण्यात आल्या नसल्याने विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. विद्यापीठ प्रशासनाने कार्यक्रम आटोपता घेतल्याने विद्यार्थी आणखीनच आक्रमक झाले. त्यामुळे शेवटी परत गेलेले कुलगुरू आणि प्रमुख पाहुणे पुन्हा एकदा हॉलमध्ये आले. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना पदवी वाटप करण्यात आल्या. त्यानंतर कार्यक्रम संपला. पण पदवी वाटपावरून झालेल्या गोंधळामुळे 63 वा हा दीक्षांत समारंभ चांगलाच गाजला.    

असा पार पडला कार्यक्रम...

'एआययू'च्या महासचिव डॉ. पंकज मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळ्याला सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2021 व मार्च-एप्रिल 2022 या परीक्षेतील पदवीधारकांना पदव्या वाटप करण्यात आले. ज्यात एकूण 60  हजार पदवी व पदव्युत्तर पदवीधारकांना पदव्या वाटप करण्यात आल्या. ज्यात सोहळ्यात 291 संशोधकांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्याला अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य उपस्थित होते. यावेळी दीक्षांत सोहळ्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संकेतस्थळ, फेसबुक पेज तसेच यूट्यूब अकाउंटवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

मोठी बातमी! धडाकेबाज IAS अधिकारी सुनील केंद्रेकरांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज; औरंगाबाद खंडपीठाकडून अर्ज न स्वीकारण्याचे आदेश

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget