एक्स्प्लोर

छ. संभाजीनगरमध्ये विचित्र अपघात, भरधाव ट्रकनं 3 कार, 7 दुचाकी आणि 1 रिक्षा उडवली, महिलेचा जागीच मृत्यू

chhatrapati sambhaji nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये थोड्याच वेळापूर्वी भीषण अपघात घडला आहे. पैठण रोडवर नक्षत्रवाडीजवळ एका भरधाव ट्रकने 3 कार, 7 दुचाकी आणि 1 रिक्षा उडवल्याची घटना घडली आहे.

chhatrapati sambhaji nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये थोड्याच वेळापूर्वी भीषण अपघात घडला आहे. पैठण रोडवर नक्षत्रवाडीजवळ एका भरधाव ट्रकने 3 कार, 7 दुचाकी आणि 1 रिक्षा उडवल्याची घटना घडली आहे. अपघातामध्ये किती जणांचा मृत्यू झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.  पण मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झालाय. अपघात झाल्यानंतर स्थानिकांची प्रचंड गर्दी झाली. शेकडो लोक घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातामधील जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये सहा जण जखमी झाले आहेत.  

काचांचा ढिग -

सोलापूरकडून धुळ्याकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती, त्याचवेळी भऱधाव ट्रक थांबलेल्या वाहनांना उडवत गेला. संध्याकाळी सात वाजण्याच्या आसपासही घटना घडली. या भीषण अपघातामध्ये जवळपास 10 ते 15 पेक्षा अधिक वाहनचालक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे रस्त्यावर वाहने, काचांचा ढिग साचला होता. घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी धाव घेतली. मात्र, सर्व वाहने एकमेकांमध्ये अडकलेली असल्याने त्यांना काढण्यात बराच वेळ गेला. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

महिलेचा मृत्यू 

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे सोलापूर हायवेवरून पैठण रोडवर ट्रक उतरत होता. त्यावेळी हा भीषण अपघात झाला. उतारावरून  खाली उतरत असताना ट्रकने 3 कार, 7 दुचाकी आणि 1 रिक्षा चिरडल्या. या अपघातामध्ये 1 महिला जागीच ठार झाली तर तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या अपघातामध्ये 6 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्यावर जवळील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

वाहतूक कोंडी

धुळे सोलापूर हायवेवरून पैठण रोडवर ट्रक उतरत होता. हा रस्ता अरुंद होता. त्यात रात्रीचेही काम चालू होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्याचवेळी ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा विचित्र अपघात झाला.   अपघानंतर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

High Court Exam Issue : उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य ऑनलाइन परीक्षेत गोंधळ, अभिजीत दिपकेंचा आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा, म्हणाले...
उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु, अभिजीत दिपकेंचा पाठिंबा, फेरपरीक्षेची मागणी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Sunil Kendrekar Majha Katta : माहिती नसलेलं FDA तुकाराममुळे समजलं, तो जे काम करतोय ते उत्कृष्ट, माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकरांकडून 'माझा कट्टा'वर कौतुक
माहिती नसलेलं FDA तुकाराममुळे समजलं, तो जे काम करतोय ते उत्कृष्ट, माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकरांकडून 'माझा कट्टा'वर कौतुक
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget