Lok Sabha Election 2024 : मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) ठाकरे गटातील चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यातील वादाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. कारण, लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या (Lok Sabha Election Candidates List) यादीत माझं नाव असणे किंवा नसणे महत्वाचे नाही. ज्याला उमेदवारी मिळेल त्याचं काम मी करणार असल्याची भूमिका अंबादास दानवे यांनी स्पष्ट केली आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत आपण ठाकरेंची शिवसेना सोडणार नसल्याचे देखील अंबादास दानवे म्हणाले आहेत. 


छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा लढवण्यासाठी खैरे आणि दानवे इच्छुक आहेत. तर, खैरे यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दानवे यांनी देखील उमेदवारीवर दावा केला होता. तसेच दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका देखील केली होती. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवण्यासाठी थेट पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न झाले. मात्र, आता दानवे यांनी एक पाऊल मागे घेतले असून, पक्षाकडून ज्याला उमेदवारी मिळेल त्याचे काम करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे खैरे-दानवे वाद संपला असल्याची चर्चा आहे. 


दानवे शिंदे गटात जाणार का?


चंद्रकांत खैरे आणि दानवे यांच्यातील वाद समोर आल्यावर दानवे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यान यावर बोलतांना दानवे म्हणाले की, “ते म्हणत असतील येणार, मात्र मी जाणार नाही. मी उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे. मी सुस्पष्टपणे सांगत आहे. जे म्हणतात जाणार, याबाबत त्यांनाच विचारणा करा. त्यांना उमेदवार मिळत नसून, हे त्यांचे अपयश आहे. विशेष म्हणजे भाजपची ही हार आहे, असेही दानवे म्हणाले. 


मनोज जरांगेंच्या बैठकीवर प्रतिक्रिया


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीत बैठक बोलावली होती. तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक अपक्ष उमेदवार देण्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे. यावर बोलतांना दानवे म्हणाले की, “मनोज जरांगे यांच्या भूमिकेतून फटका कोणाला बसतो हे त्याच परिस्थितीवर अवलंबून असते. कोणता उमेदवार उभा असतो त्यावर ते अवलंबून असते, असे दानवे म्हणाले. 


फडणवीसांनी धनगर आरक्षणाबाबत दिलेलं आश्वासन पूर्ण झालेले नाही


मागील अनेक दिवसांपासून राज्यात गाजत असलेल्या धनगर आरक्षणाच्या मुद्यावर बोलतांना अंबादास दानवे म्हणाले की, “अटलजींनी सभा घेतली होती. धनगडच धनगर केले जाईल अशी भूमिका त्यावेळी त्यांनी घेतली होती. त्यावेळी अटलजींनी दिलेलं व फडणवीसांनी दिलेला आश्वासन  पूर्ण झालेले नाही, असे दानवे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


मोठी बातमी : खैरे-दानवे वादावर उद्धव ठाकरेंची बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?