छत्रपती संभाजीनगर : एका महिलेने अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेतले, यावेळी आईकडे धावलेल्या दोन चिमुकल्या मुलींचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. कौटुंबिक वादातून एका महिलेनं अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतलं. स्वत:ला पेटवून पेटवून घेतलेल्या आईकडे धाव घेतलेल्या दोन मुलींचा होरपळून मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या आंचल गावातील ही घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


महिलेनं अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवलं


कौटुंबिक वादातून एका महिलेनं स्वत:ला पेटवून घेतलं. पण, यावेळी महिलेच्या चिमुकल्या दोन मुली आगीत होरपळत असलेल्या आईकडे धावल्या. यावेळी पेटलेल्या आईसोबत आगीत चिमुकल्या दोघीही होरपळल्या. यामुळे एका मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरी मुलगी गंभीररित्या जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, दुसऱ्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.


आईकडे धावलेल्या दोन मुलींचा होरपळून मृत्यू


वैजापूर तालुक्यातील आंचलगाव येथे कौटुंबिक वादातून रात्री एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्यानंतर तिला वाचविण्यासाठी आलेला पती आणि पेटलेल्या आईकडे धावलेल्या दोन चिमुकल्याही गंभीररित्या भाजल्या. यात एका सात महिन्यांच्या चिमुकलीचा  जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला तर सहा वर्षांच्या कल्याणी या दुसऱ्या मुलीचा उपचार सुरू असताना रात्री घाटीत मृत्यू झाला. पत्नी आणि मुलींना वाचवण्यासाठी पतीनेही प्रयत्न केला. मात्र, या आगीत पतीही गंभीररित्या जखमी झाला.


पती-पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरु


ही घटना ऐन होळी सणाच्या दिवशी घडली आहे. गंभीर भाजलेल्या दाम्पत्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत उपचार सुरू आहे. सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेमध्ये दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. तर आई-वडील दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा भीषण स्फोट; संपूर्ण कुटुंब होरपळलं, चार चिमुकल्यांनी जीव गमावला