एक्स्प्लोर

काय सांगता! टोमॅटोच्या शेताला CCTVचं कवच, चोऱ्या थांबवण्यासाठी शेतकऱ्याची आयडीयाची कल्पना

Aurangabad News : मागील काही दिवसांत टोमॅटोला चांगला दर मिळत असून, काही ठिकाणी हा दर 200 रुपये किलोवर जाऊन पोहचला आहे.

Aurangabad News : टोमॅटोचे (Tomato) भाव गगनाला भिडल्यामुळे टोमॅटोच्या शेतातून टोमॅटो चोरीला जायला लागलेत. त्यामुळे औरंगाबादच्या (Aurangabad) एका शेतकऱ्याने टोमॅटो चोरीला जाऊ नये म्हणून चक्क आपल्या टोमॅटोला सीसीटीव्हीचं (CCTV) कवच दिलं आहे. संपूर्ण टोमॅटोच्या दीड एकर शेतीभोवती सीसीटीव्ही बसवले आहेत. औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील शहापूर बंजर गावच्या शरद रावते या शेतकऱ्यांने हे सीसीटीव्ही बसवले आहेत. यासाठी त्यांनी तब्बल 22 हजार रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे परिसरात सध्या या घटनेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. 

मागील काही दिवसांत टोमॅटोला चांगला दर मिळत असून, काही ठिकाणी हा दर 200 रुपये किलोवर जाऊन पोहचला आहे. त्यामुळे टोमॅटो लावणाऱ्या शेतकऱ्यांना देखील यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे. पण, टोमॅटोला अधिकचा दर मिळत असल्याने यावर आता चोरांची नजर पडली आहे. त्याचं  कारण म्हणजे औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील शहापूर बंजर येथील शरद रावते यांच्या शेतातील टोमॅटो अक्षरशः चोरीला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे टोमॅटोच्या चोऱ्या रोखण्यासाठी रावते यांनी शक्कल लढवत चक्क टोमॅटोच्या पिकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. 

पाहा व्हिडीओ : Chhatrapati Sambhajinagar Tomato CCTV : शेतातून टोमॅटोची चोरी, शेतीला सिसीटीव्हीचे कवच

शरद रावते यांच्याकडे एकूण अडीच एकर शेती आहे. दरवर्षी ते आपल्या शेतात टोमॅटोची लागवड करतात. दरम्यान, यंदाही त्यांनी आपल्या दीड एक्कर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली.  रोप आणण्यापासून तर औषध फवारणी, बांधणी, मजुरी असा त्यांना एकूण 70 ते 80 हजार रुपयांचा खर्च आला आहे. तसेच पुढील आठ ते दहा दिवसात टोमॅटो तोडणीला येणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच शेतातील टोमॅटोची चोरी होत असल्याने ते अडचणीत सापडले होते. शेवटी यावर पर्याय म्हणून त्यांनी संपूर्ण टोमॅटोच्या शेतात सीसीटीव्ही बसवले आहे. 

चोरीच्या घटनांनी शेतकरी वैतागले... 

गंगापूरच्या लासूर स्टेशन परिसरात दरवर्षी शेतकरी भाजीपाला लागवड करतात. त्यातून अनेकदा  एखांद्या पिकाची लॉटरी लागून जाते.  दरम्यान, याच परिसरातील आसेगाव, शहापूर बंजर, आंबेगाव, खोजेवाडीसह इतर गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली आहे. त्यामुळे सध्याचा भाव पाहता या शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न होण्याची शक्यता आहे. मात्र, रात्रीच्या सुमारास टोमॅटोची चोरी होत असल्याने शेतकरी वैतागले आहे. तर अनेक शेतकऱ्यांना रात्रीचा मुक्काम शेतात करण्याची वेळ आली आहे. तर काही शेतकरी यावर आता सीसीटीव्हीचा पर्याय शोधत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Chhatrapati Sambhaji Nagar : बाजारात दर वाढले अन् बागेतील डाळिंबांची रात्रीतून चोरी; संभाजीनगरमधील घटना

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget