औरंगाबाद : वैजापूर शहरातील लॉजवर लपून चालणाऱ्या कुंटनखान्यावर पोलीसांनी धाड टाकून, पिडीताची सुटका केली आहे. विशेष म्हणजे माजी उपसभापतीच्या लॉजवर हा सर्व प्रकार सुरु होता. सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी आपल्या पथकासह वैजापूर शहरातील महाराणा चौकातील लक्ष्मी लॉज याठिकाणी धाड टाकली. यावेळी लॉज मालक व मॅनेजर हे स्वत:चे आर्थिक फायद्याकरता महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे समोर आले आहे. विष्णु भिमराव जेजुरकर (वय 73 वर्षे, लॉज मालक, रा. महाराणा प्रताप चौक, वैजापुर) मच्छिंद्र विनायक जगदाळे वय 43 वर्षे, मॅनेजर, रा.बेलगाव ता. वैजापूर) असे आरोपींचे नावं आहेत. विशेष म्हणजे विष्णु जेजुरकर माजी उपसभापती आहे.
वैजापूर शहरातील महाराणा चौकातील लक्ष्मी लॉजमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती महक स्वामी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सपोनि आरती जाधव अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथक (AHTU) यांचे पथकाच्या मदतीने दुपारच्या सुमारास लक्ष्मी लॉजच्या परिसरात सापळा लावला. यासाठी एक डमी ग्राहकांस लक्ष्मी लॉज येथे पाठवले. यावेळी डमी ग्राहकाला लॉज मॅनेजर मच्छिंद्र विनायक जगदाळे यांने भेटून तुम्हाला पाहिजे ते भेटेल असे सांगितले. तसेच, पहिल्या मजल्यावरिल रूम नं 201 मध्ये जा तेथे एक महिला पाठवितो सांगितले. यावरुन तेथे अवैधरित्या वेश्याव्यवसाय करून घेताला जातो आहे याबाबत पथकांची खात्री झाली. तसेच पथकाने पाठवलेल्या डमी ग्राहकाने रूममध्ये गेलावर पथकाला इशारा केला.
डमी ग्राहकाने लपुन बसलेल्या पथकाला ईशारा करताच पथकांने लॉजवर छापा मारला. तसेच पिडीत महिलेची सुटका केली. पोलिसांनी कारवाई केल्यावर लॉज मालक विष्णु भिमराव जेजुरकर आणि मॅनेजर मच्छिंद्र विनायक जगदाळे यांना ताब्यात घेतले. तसेच दोघांच्या विरुध्द कलम 3,4,5, अनैतिक देह व्यापार अधिनियम 1956 प्रमाणे पोस्टे वैजापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी रोख रक्कम 12 हजार 290 रूपये, मोबाईल फोन, निरोध पाकिट असा एकुण 36 हजार 490 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, माजी उपसभापतीच्या लॉजवरच कुंटनखाना सुरु असल्याचं समोर आल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
यांनी केली कारवाई...
पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल कृष्णा लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधीक्षक महक स्वामी, सपोनि आरती जाधव, पोलीस अंमलदार वर्षा गाडेकर, अनिल धुरंधरे, ईशाद पठाण यांनी केली आहे. पोलिसांच्या या कारवाईचं परिसरात कौतुक होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
घरात हनुमान चालीसा म्हटल्याने इतरांच्या भावना कशा दुखावतील?; खंडपीठाकडून गुन्हा रद्द करण्याचे आदेश