औरंगाबाद : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दोन दिवसीय मराठवाडा (Marathwada) दौऱ्यावर आहेत. जयंत पाटील (Jayant Patil) हे आज आणि उद्या मराठवाड्यातील चार जिल्ह्यांच्या दुष्काळ सदृश भागाची पाहणी करणार आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून, त्यांच्या व्यथा जाणून घेणार आहे. तर, याच दौऱ्यात पाटील हे कार्यकर्त्यांच्या बैठका देखील घेणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादीच्या विधानसभा मतदार संघातच त्यांचा हा दौरा असणार आहे.
असा असणार जयंत पाटलांचा दौरा...
13 सप्टेंबर (बुधवार)
स. 09.00 वा. छ. संभाजीनगर येथून बदनापूरकडे प्रयाण
स. 10 ते 12वा.बदनापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला भेट व शेतकऱ्यांशी संवाद
दु. 12.00 वा. बदनापूर येथून जालना कडे प्रयाण
दु. 12.30 वा.जालना येथे आगमन व राखीव
दु. 1.30 ते 3.00 वा.जालना येथे पदाधिकाऱ्यांशी संवाद
दु. 03.00 वा. जालना येथून सेलू कडे प्रयाण
सायं. 05.00 ते सेलू (जिंतूर विधानसभा) तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी व शेतकरी संवाद
सायं. 06.00 वा. सेलू येथे जिंतूर विधान सभा मतदारसंघातील प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक
सायं. 07.30 वा. सेलू येथून परभणीकडे प्रयाण रात्री
09.00 वा.परभणी येथे राखीव
14 सप्टेंबर (गुरुवार)
स. परभणी येथून गंगाखेडकडे प्रयाण
दु. 11.00 वा. गंगाखेड तालुक्यात दुष्काळग्रस्त शेतांची पाहणी व शेतकऱ्यांशी संवाद गंगाखेड येथे गंगाखेड मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद
गंगाखेड येथे घनदाट मामा यांच्याकडे भेट व राखीव
गंगाखेड येथून परळी कडे प्रयाण (58 मी / 30 किमी)
परळी येथे आगमन व परळी वैजनाथ मंदिरात दर्शन
सायं. 03.00 वा. परळी येथून केज कडे प्रयाण (1 तास / 60 किमी)
सायं 04.00 वा. केज तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
सायं. 05.00 वा. केज येथे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद
सायं. 06.00 वा. केज येथे पत्रकार परिषद
सायं. 06.30 वा. केज येथून पाटोदा कडे प्रयाण (1 तास / 66 किमी)
रात्री 07.30 वा. पाटोदा येथे दादासाहेब वीर (मुख्य कारखाना मुकादम) यांच्या कुटुंबातील विवाह प्रीत्यार्थ भेट
रात्री 8:00 वा. पाटोदा येथून अहमदनगर कडे प्रयाण ( 2 तास 20 मी/ 105 किमी)
रात्री 10:30 वा. अहमदनगर येथे आगमन व राखीव
इतर महत्वाच्या बातम्या: